सहा.जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांची आदिवासी दिनानिमित्त धामणदरी गावाला भेट, ढेमसा नृत्याने त्यांचे जंगी स्वागत

सहा.जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांची आदिवासी दिनानिमित्त धामणदरी गावाला भेट, ढेमसा नृत्याने त्यांचे जंगी स्वागत

किनवट :- (प्रतिनिधी) आदिवासी दिनानिमित्त किनवटचे सहा जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पुजार यांनी आपल्या कुटुंबासह तालुक्यातील पेसा अंतर्गत असलेल्या धामणदरी गावाला भेट दिली असून यावेळी त्यांनी विर बाबुराव शेडमाके नगराच्या नाम फलकाचे अनावरण करून पेसा अंतर्गत पायाभूत सुविधासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले तर वाढदिवसानिमित्त सहा जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पूजार यांना गावकर्यानी साडी चोळी देऊन सत्कार केला तसेच केक भरऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. Assistant Collector Kirtikumar H Pujar visits Dhamandari village on the occasion of Tribal Day


नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन किनवट तालुक्यात सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा झाला या दिनाचे औचित्य साधून किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार एच पूजार यांनी त्यांच्या पत्नीसमवेत तालुक्यातील पेसाअंतर्गत असलेल्या धामनदरी गावाला भेट दिली गावात पदार्पण होताच आदिवासी ढेमसा नृत्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले या भेटीत त्यांनी गावात फेरफटका मारून आदिवासी बांधवासी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर विर बाबुराव शेडमाके नगराच्या नामफलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले गावातील पायाभूत सुविधा साठी पेसा योजनेअंतर्गत तसेच ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी धामदरी वासियांना दिले आहे.

धामणदरी नंतर त्यांनी वसवाडी गावाला भेट देऊन तेथील आदिवासी नागरिकांच्या समस्या विषयी विचारपूस करून सिंचनाची सोय करून देण्याचे आश्वासन दिले जागतिक आदिवासी दिनाबरोबरच 9 ऑगस्ट रोजी सहा जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांचासुद्धा वाढदिवस असल्यामुळे धामदरी व वसवाडीच्या नागरिकांनी त्यांचा साडीचोळी देऊन सपत्नीक सत्कार केला व केक भरउन त्यांचे अभिष्टचिंतन केले गावकऱ्यांच्या या प्रेमाला भारावून गेलेल्या कीर्तिकुमार पुजार यांनी तेथील आदिवासी बांधवांसोबत पारंपारिक भोजनाचा आस्वाद घेतला याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार


ग्रामविकास अधिकारी संतोष कुमार धोकटे, तलाठी श्री डुकरे, सरपंच नंदकुमार नागोराव कऱ्हाळे,पांडुरंग गाडे, देवराव मडावी, सुहास राठोड, बबलू जाधव,दिगंबर मडावी, अंकुश भालेराव, सतीश नाईक, देवराव आडे, नूर्सिंग जाधव, तुकाराम कांबळे, पंडित कुमरे यांचा सह धामणधरी,वसवाडी येथील नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते

<

Related posts

Leave a Comment