मुंबई : राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर मतांची फोडाफोडी होऊ नये म्हणून राज्यातील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या चारही प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेलांमध्ये ठेवलं आहे. त्याचबरोबर मतदानाला आता काही तासचं उरले असल्यानं अपक्षांच्या गाठीभेटी आणि आमदारांच्या मार्गदर्शनाचे वर्ग घेतले जात आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election 2022)
विधानपरिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार असून यावेळी आमदार फुटण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. सर्वांनीच खबरदारी घेतली असून आज सर्व विधान परिषदेची आमदारांची पुन्हा बैठक घेतली आहे.
राज्यसभेतील झालेल्या दगाफटका विधानपरिषदेला होऊ नये यासाठी मविआकडून सावध पवित्रा घेण्यात आला आहे. त्यातून गुप्त मतदान पद्धती असल्याने एका उमेदवाराला किती आमदारांनी मत द्यायचे हे मुख्यमंत्री शेवटच्या क्षणाला ठरवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी मविआची रणनीती बदलण्याची शक्यता आहे. “दुध पोळलं तर ताक पण फुकून पितो.” असं अजित पवार म्हणाले आहेत. “सध्या आपापल्या पद्धतीने तयारी करावी शेवटच्या क्षणी मी आदेश देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.” असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान भाजपही आपल्या मतांचे गणित जुळवताना पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या सर्व आमदारांना जमा केलं असून मतांच्या आकडेवारीमध्ये गुंग असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. तर सर्व पक्षांच्या आमदारांच्या बैठकांना जोर आलाय. भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक आजारी असताना मतदानासाठी हजर असणार आहेत. तसेच राज्यसभेच्या मतदानासाठी अॅम्बुलन्समधून आलेले चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे.
भाजपचे चंद्रकांत पाटलांनी आम्ही पाचही जागांवर विजय मिळवणार असून महाविकास आघाडीची एक विकेट पडणार आहे असा दावा केला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमच्या आमदारांवर ईडीचा दबाव टाकला जात आहे असा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर अपक्ष पण भाजपाला जाहीर पाठिंबा असणारे आमदार रवी राणा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय. मतदानाच्या तोंडावर घडत असलेल्या या घटनेमुळे सर्व पक्षांची आणि नेत्यांची धाकधूक वाढली असून सर्वांचे बैठकीचे सत्र सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या ——
- कोण आहे IAS पूजा खेडकर? व्हीआयपी मागण्या करणाऱ्या आयएएस प्रशिक्षणार्थीं चर्चेत
- Who Is Manu Bhaker।कोन आहे मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचणारी भारताची स्टार नेमबाज
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णय
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 3.0 72 मंत्र्यांसह, मंत्रिमंडळात 9 नवीन चेहरे | Modi 3.0 With 72 Ministers Takes Oath, 9 New Faces In Cabinet