Online Team : सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलेले आहे. Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या 12 आमदारांनी तालिका अध्यक्षांना धक्का-बुक्की करत शिवीगाळ केली, असा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे.
निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका, मात्र त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली. Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended
तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आलेला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. सभागृहात हा ठराव एकतर्फी मांडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विरोधी पक्षाची सभागृहातील संख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, हे सर्व 12 आमदार राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहे. Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील… Read more: जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same… Read more: महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत… Read more: बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका,… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
