नांदेड (जिमाका) दि. 5 :- मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी “सारथी” मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सेवा-अराजपत्रित संयुक्त (गट-ब) पदाच्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. “सारथी”ने उपलब्ध करुन दिलेल्या या नि:शुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे, असे आवाहन व्यवस्थापकिय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे. या सर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार 13 ऑगस्ट 2021 पर्यंत असून अधिक माहितीसाठी http://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी (अराजपत्रित)…
Read MoreTag: Sarathi
‘सारथी’ संस्थेच्या मुख्यालयाचे भूमीपूजन लवकरच
मुंबई :- मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपसमितीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रत्यक्ष तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (सारथी) विभागीय केंद्र व जिल्हा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतीमान करण्यात आली आहे.सध्या कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच पुण्यातील मुख्यालयाच्या बांधकामास 42.70 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरच त्या कामांचा शुभारंभ करण्यात येईल.…
Read MoreSarthi Meeting |सारथी संस्थेला पूर्णतः स्वायत्तता, अजित पवार सोबत बैठकीत बहुतांश प्रमुख मागण्या मान्य.
राज्यात सारथीची आठ विभागीय कार्यालये सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली असून कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करण्यासाठी नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांना या बैठकीत निर्देश दिले. प्रमुख शैक्षणिक शहरांच्या ठिकाणी सारथीच्या माध्यमातून वसतीगृह उभारणी, सारथीमधून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा, प्रशिक्षण, संशोधन यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्याची मागणी आपण मान्य करून घेतली. सारथी लाभार्थी साठी उत्पन्न मर्यादा ८ लाख असून त्यात १ लाखाच्या आत ,३ लाखाच्या आत, ३ ते ५ लाखाच्या आत व ५ ते ८ लाखाच्या आत असे टप्पे तयार करून अभ्यासक्रम निहाय…
Read MoreSarathi संस्थेच्या इमारतीसाठी जमीन आणि अधिकारी-कर्मचारी उपलब्धचा संचालक मंडळाची बैठकीत निर्णय
Online Team : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेची संचालक मंडळाची बैठक काल दि. 1 जून 2021 रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे सारथी संस्थेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी पुणे शहरातील शिवाजीनगर भाबुर्डा मधील सी.स.नं १७३/१ब मधील ४१६३ चौ.मी जमीन मिळाली आहे. संस्थेस ४१ अधिकारी/कर्मचाऱ्यांचा स्टाफ महाराष्ट्र शासनाने दि. ०४ मे २०२१ रोजी मंजूर केला असून त्या मुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विशेष अभिनंदनाचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला. सारथी संस्थेमार्फत…
Read More