साधारणतः पंधरा वर्षांपूर्वीचे हे छायाचित्र आहे. एसटी बसमधून खाली उतरणारे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख तथा आबासाहेब आहेत. शुक्रवार, दि. ३० जुलै रोजी रात्री त्यांचे निधन झाले आणि त्यांचा सातारा येथील बस प्रवासाचा प्रसंग आठवला.आमदार कसा असावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आबासाहेब होते. आताच्या राजकीय बजबजपुरीत आबासाहेब बसने प्रवास करत होते, हे सांगून कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. काल, परवा सरपंच झालेल्या पोराच्या दारात काही दिवसात बोलेरो अथवा स्कॉर्पिओ येते. नगरसेवक, सभापती अथवा जिल्हा परिषद सदस्य झाला की दारात इनोव्हा येते. आमदार झाले की दारात…
Read More