कालिचरण महाराज छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले. ते असे म्हणाले आता एक आंदोलन सुरु झालं होतं ते तुम्हाला माहिती आहे का, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडायचं. अशी हवा होती त्या आंदोलनाची… अशी हवा… लाखो लोकं मुंबईत. टेन्शन काय होतं माहिती आहे? एवढे लोकं जेवतील कुठे आणि टॉयलेटला जातील कुठे? मला टेन्शन आलं की, त्यांनी आता जावं कुठे? कुठला त्यांचा नेता थडग्यावर चादर चढवेल. आला रे चादरवाला आला रे आला. हे जाती-जातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाहीत तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस आहेत. राक्षस… , असं म्हणत कालिचरण महाराज यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती. This is a monster that breaks into Hinduism; Kalicharan Maharaj’s venomous comments on Manoj Jarange Patil
मनोज जरांगेला (Manoj Jarange Patil) जातीच्या आरक्षणाशी काहीही देणेघेणं नाही. जरांगे हा हिंदुत्त्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, अशी जहरी टीका कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना आक्रमक भाषेत भाष्य करत लक्ष्य केले.
मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा जोरदार फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी तडकाफडकी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे.
सदरील कालीचरण महाराजांचा कार्यक्रम शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख यांनी ठेवला असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख यांनीच हा कार्यक्रम संजय सिरसाठ यांच्या प्रचारार्थ घडवून आणला असल्याचे पुरावे त्यांच्या सोशल मीडियावरून प्रसिद्ध केलेले आहेत. संजय शिरसाठ का नाकरत आहेत की सदरील कालीचरण महाराजांचा कार्यक्रम ठेवला असल्याचे. आता वादग्रस्त वक्तव्यात अंगलट आल्याने संजय शिरसाठ हात झटकत असल्याचे बोलले जात आहे.