मुंबई : महाराष्ट्रात २००७ पासून फिरतोय, प्रत्येक दौऱ्यात आरक्षण का हवे, याबाबत जनजागृती केली. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. मी अठरा पगड जात, १२ बलुतेदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. गरीब मराठ्यांसाठी माझा लढा आहे. समाजासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन उभे राहिले, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानात शनिवारपासून उपोषण सुरू केले आहे, त्यावेळी ते बोलत होते. आम्ही १७ जूनला ज्या मागण्या केल्या होत्या, त्याच मागण्या कायम आहेत. त्यात तसूभरही बदल केला नाही; पण सरकारने मागण्या…
Read MoreTag: मराठा क्रांती मोर्चा
मराठा आरक्षण केंद्र राज्य करु नका, लोकप्रतिनिधीनो कृती करा, अशोक चव्हाण अनुपस्थित का? – संभाजीराजे
नांदेड | मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी आंदोलनं झाली. छत्रपती संभाजी राजे हे सध्या प्रत्येक जिल्ह्यातील लोकांची मतं जाणून घेत आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याला सर्वपक्षीय नेते पाठींबा देताना आपण पाहिलं असेल. पण आज नांदेड येथे अशोकराव चव्हाण हे अनुपस्थित होते. यावरून चांगलंच वातावरण पेटलं आहे. संभाजीराजे यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. अशोकरावांकडे मराठा आरक्षणाबाबत कोणतंच उत्तर नाही. म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, अशी टीका संभाजीराजे यांनी केली आहे. अशोकराव हे दिल्लीला आले होते ते सर्वांना…
Read Moreप्रितमताई मुंडे मराठा ओबीसीच आहे
खासदार प्रितम ताई मुंडे लोकसभेत बोलतांना म्हणाल्या की, ‘सर्वच फिरून फिरून मराठा आरक्षणावर बोलत आहेत ओ बी सी आरक्षणावर कोणीच काहीच बोलत नाही.’ असा त्यांचा संताप झाला,त्रागा झाला.त्यात त्यांनी इतर अनेक मुद्दे मांडलेले आहेत.वास्तविक हे विधेयक obc ठरविण्याचे अधिकार राज्यांना मिळावेत याबाबत होते.म्हणजे ते obc बद्दलच होते.त्यात मराठा आरक्षणाचा विषय यासाठी मध्ये येतो की मराठा आरक्षणाच्या एकूण सर्व प्रक्रियेचा परिणाम संपूर्ण देशभर होतो आहे.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा त्याच अर्थाने देशभर घेतला गेलेला आहे.मराठा आरक्षण हा विषय आत्ता एका राज्याचा राहिलेला नाही.त्या निमित्ताने आरक्षण विषयक संपूर्ण घटनात्मक चौकटी, नियम, न्यायालयाच्या व…
Read Moreमराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी “सारथी” मार्फत स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण
नांदेड (जिमाका) दि. 5 :- मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी “सारथी” मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सेवा-अराजपत्रित संयुक्त (गट-ब) पदाच्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. “सारथी”ने उपलब्ध करुन दिलेल्या या नि:शुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे, असे आवाहन व्यवस्थापकिय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे. या सर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार 13 ऑगस्ट 2021 पर्यंत असून अधिक माहितीसाठी http://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी (अराजपत्रित)…
Read Moreनरेंद्र पाटलांनी हातावर गोंदलं ‘देवेंद्र’ नाव; म्हणाले, “छातीवर गोंदवणार होतो, पण…”
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील सध्या आपल्या टॅटूमुळे चर्चेत आहेत. नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर चक्क राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा टॅटू काढला आहे. ‘देवेंद्र’ असा टॅटू आपल्या मनगटावर काढला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देत असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. (Narendra Patil has a tattoo name of Devendra on his hand) “आमच्या ह्रदयात, ओठावर देवेंद्र आहेत. फक्त अधिकृतपणे आता टॅटू काढला आहे. त्यामुळे ज्याच्या हातावर आणि ओठावर देवेंद्र आहे त्याने हातावर काढला आहे. एक आठवडा आधी पाटणच्या दौऱ्यावर असताना मी हा…
Read Moreमराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा !
मुंबई, दि. ४ : एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथिल करावी, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना बहाल करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. श्री. चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रकरणी निकाल देताना १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना राहिलेले नसून, ते अधिकार केंद्राकडे आहेत, तसेच मराठा…
Read More‘सारथी’ संस्थेच्या मुख्यालयाचे भूमीपूजन लवकरच
मुंबई :- मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपसमितीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रत्यक्ष तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (सारथी) विभागीय केंद्र व जिल्हा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतीमान करण्यात आली आहे.सध्या कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच पुण्यातील मुख्यालयाच्या बांधकामास 42.70 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरच त्या कामांचा शुभारंभ करण्यात येईल.…
Read MoreWhat Is Sarthi,Functions and Objectives ? काय आहे सारथी संस्था , कार्य व उद्दिष्टें बाबत जाणून घ्या सविस्तर…
मुंबई, दि. २९ :- मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रवर्गातील उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक उमेदवारांना उच्च शिक्षणासाठीअर्थसहाय्य देण्यात येते. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कलम 8 अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि आमच्या संस्थेमध्ये जोरदार क्षेत्रांचा समावेश आहे, संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन करणे. http://sarthi-maharashtragov.in/ या वेबसाईट वेळोवेळी भेट द्यावी सूचना वाचव्यात व विविध उपक्रमाचा लाभ घ्यावा.…
Read MoreAshok Chavan’s letter to all party MPs for Maratha reservation
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. श्री. चव्हाण यांनी शनिवारी राज्यातील सर्व पक्षांच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले असून, या पत्रात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता विषद केली आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी दिलेला निकाल व त्या अनुषंगाने निर्माण…
Read Moreमराठा आरक्षणाापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या 11 प्रश्नावर शिवसेना खासदार पंतप्रधानांना भेटणार
नवी दिल्ली: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली. आम्हाला अभ्यास शिकवू नका. आधी मराठ्यांना आरक्षण द्या. मग आम्हाला शिकवा, असा हल्ला चढवतानाच मराठा आरक्षणावर आम्ही रावसाहेब दानवेंचं कोचिंग करू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. (Shiv Sena MP will meet the Prime Minister on 11 Points With Maratha reservation raised by Chief Minister Uddhav Thackeray) संजय राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची आज बैठक पार पडली. यावेळी राऊत यांनी मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्रातील काही प्रश्न…
Read More