मराठा आरक्षण केंद्र राज्य करु नका, लोकप्रतिनिधीनो कृती करा, अशोक चव्हाण अनुपस्थित का? – संभाजीराजे

मराठा आरक्षण केंद्र राज्य करु नका, लोकप्रतिनिधीनो कृती करा, अशोक चव्हाण अनुपस्थित का? – संभाजीराजे

नांदेड | मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी आंदोलनं झाली. छत्रपती संभाजी राजे हे सध्या प्रत्येक जिल्ह्यातील लोकांची मतं जाणून घेत आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याला सर्वपक्षीय नेते पाठींबा देताना आपण पाहिलं असेल. पण आज नांदेड येथे अशोकराव चव्हाण हे अनुपस्थित होते. यावरून चांगलंच वातावरण पेटलं आहे. संभाजीराजे यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे.

अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. अशोकरावांकडे मराठा आरक्षणाबाबत कोणतंच उत्तर नाही. म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, अशी टीका संभाजीराजे यांनी केली आहे. अशोकराव हे दिल्लीला आले होते ते सर्वांना भेटले पण मला भेटले नाहीत कारण काय आहे?, असा सवालही त्यांनी केला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी आंदेलन झाली त्या आंदेलनाला तेथील नेते हे उपस्थित होते मग आज अशोकराव का आले नाहीत. आम्ही पण 96 टक्के वाले मराठे आहोत असं म्हणत त्यांनी अशोकरावांना त्यांच्याच कर्मभूमीत चर्चेचं आव्हान दिलं आहे. अशोकराव म्हणाले होते की आम्ही मराठा वस्तीगृह बांधू त्याचं काय झालं, असा सवालही त्यांनी केला आहे.

58 मोर्चे आपण शांततेमध्ये काढले. समाज बोलला आता लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे, म्हणून मी समाजाच्या लोकप्रतिनिधींना एकत्र येण्याचं आवाहन करतो आहे. अशोकराव का आले नाहीत याचं उत्तर आम्हाला हवं आहे. नांदेडकरांचा सुपुत्र आज खरी गरज असताना आला नाही, अशा शब्दात संभाजीराजेंनी अशोक चव्हाणांवर टीका केली आहे.

<

Related posts

Leave a Comment