पुणे, : आपल्याच शेतात चांगले उत्पादन घ्या अन सरकारच्या कृषी विभागाचे बक्षीसही मिळवा. कृषी खात्याने यावर्षीच्या खरिपासाठी पीकस्पर्धा जाहीर केलीय. त्यात सहभागी व्हायचे असेल तर मुग व उडीदासाठी दि. ३१ जुलै पूर्वी व इतर खरीप पिकांसाठी दि. ३१ ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करावा लागणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या सहभागाची कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी अपेक्षा केली आहे. शेतकऱयांनी चांगले पीक उत्पादन घ्यावी, पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांनी चांगले प्रयोग करावेत आणि अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने यंदा खरिप हंगामासाठी पीक स्पर्धा आयोजीत केली आहे. पीक स्पर्धेसाठी…
Read More