Online Team : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 28 मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत निकष जाहीर केले. त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शाळांना शासनानं ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये जाहीर होणार आहे. शाळांकडून दहावीच्या निकालसंदर्भातील शासन निर्ण्ययानुसार गुण नोंदवण्यात येत असल्याची माहिती आहे. (Maharashtra SSC Result MSBHSE ssc exam result ma be declare on second week of july)
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याच सूत्र निश्चित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं शासन निर्णयाच्या अधीन राहून दहावीचा निकाल वस्तूनिष्ठचं असायला हवा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत. प्रक्रियेचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
असा लावणार दहावीचा निकाल ?
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी आणि 10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जुलै महिन्यात जाहीर होईल, असं म्हटलं होतं.
i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य सरकारनं निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे वस्तूनिष्ठपणे निकाल जाहीर करावा, अशा सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. मूल्यमापन पद्धतीच्या नियमांचा भंग केल्यास शाळांवर कारवाई होणार आहे. मुल्यमापनात फेरफार झाल्यास शाळांची मान्यताच होणार रद्द किंवा शाळेचा सांकेतिक क्रमांक बोर्डाकडून काढून घेण्यात येणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी शाळास्तरावर समिती स्थापन करावी लागणार आहे. या समितीमध्ये मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षकांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांचा नववीचा निकाल ,दहावीच्या मूल्यमापनाची कागदपत्रे आणि उत्तरपत्रिका निकाल समितीच्या पडताळणीनंतर मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवावे लागणार आहेत. शाळास्तरावर निकालाची तपासणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत होणार आहे.दहावीच्या मूल्यमापनासंदर्भात माध्यमिक बोर्डाकडून शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय?राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय? State shook, kidnapping…
- भाजपचे राहुल नार्वेकरच हेडमास्तर; दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड |BJP’s Rahul Narwekar to become Maharashtra assembly speaker once more, unopposedमुंबई । भाजपचे कुलाब्यातील आमदार राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी, हा विक्रम आतापर्यंत केवळ काँग्रेसचे आमदार बाळासाहेब भारदे…
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवेदनशील प्रसंगावधान; कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या विवाह प्रसंगी हजेरी लावून शब्द पाळलामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर येथे एका लग्न समारंभाला हजेरी लावली, जिथे त्यांनी 2016 कोपर्डी बलात्कार आणि हत्या…
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे का ? जीवन परिचय |Devendra Fadnavis Biographyदेवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नाव आहे ज्यांनी आपल्या वडिलांकडून राजकारणाचा वारसा घेऊनही आपली वेगळी ओळख निर्माण…