Sexual health | पुरुषानो लैंगिक आरोग्यासाठी हा सर्वोत्तम उपाय, जागतिक पातळीवर लैंगिक आरोग्यावर झालेलं संशोधन.

Sexual health | पुरुषानो लैंगिक आरोग्यासाठी हा सर्वोत्तम उपाय,  जागतिक पातळीवर लैंगिक आरोग्यावर झालेलं संशोधन.

लैंगिक विषयावर चर्चा करणं भारतीय समाजात वर्ज्य मानलं जातं. त्याचा एक टॅबू तयार झालाय. या विषयावर खुलेपणाने बोलणं अमान्य करुन न्यूनगंडही तयार केला जातो. कायमच लोक काय म्हणतील असं म्हणत याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होतो. मात्र, याचा गंभीर परिणाम समोर येताना दिसत आहेत. सध्याच्या काळात लैंगिक आरोग्य (Sexual Health) हा ऐरणीचा विषय ठरत आहे. त्यामुळेच याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चला तर मग जागतिक पातळीवर लैंगिक आरोग्यावर झालेलं संशोधन आणि त्यातून सुचवण्यात आलेले काही उपाय पाहुयात (Important tips for Sexual health of men ).

इतर कोणत्याही आरोग्याप्रमाणेच लैंगिक आरोग्याचा आणि तुमच्या जीवनशैलीचा खूप जवळचा संबंध असतो. यात तुमचं जेवण, झोप आणि व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच या गोष्टींमध्ये योग्य निर्णय घेतले तर आरोग्यदायी लैंगिक आयुष्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

पुरेशी झोप महत्त्वाचा
संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर समोर आलेल्या आकेडवारीनुसार, दररोज 7 तासांपेक्षा अधिक झोप घेणाऱ्या 31.7 टक्के पुरुषांना लैंगिक संबंधांच्यावेळी कोणतीही अडचण (Erection confidence) येत नाही. दुसरीकडे 5 तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या लोकांमध्ये हे प्रमाण केवळ 18 टक्के इतके आहे. यावरुन झोपेचा तुमच्या लैंगिक आयुष्यावर किती परिणाम होतो हे स्पष्ट झालंय.

दैनंदिन व्यायाम आवश्यक
झोपेप्रमाणेच दैनंदिन व्यायामचंही लैंगिक आरोग्यात महत्त्वाचं स्थान आहे. नियमितपणे व्यायाम करणाऱ्या 27 टक्के पुरुषांना आदर्श स्खलनाचा (Ideal ejaculation) अनुभव घेता येतो. दुसरीकडे नियमित व्यायाम न करणाऱ्यांमध्ये हेच प्रमाण केवळ 19.5 टक्के इतकं आहे. लैंगिक संबंधाच्यावेळीचं योग्यवेळीचं स्खलन आणि व्यायामाचा जवळचा संबंध असल्याचं सिद्ध झालं आहे.

चांगल्या लैंगिक आरोग्यासाठी आरोग्यदायी सवयी अंगा बाळगा
एकूणच चांगल्या लैंगिक आरोग्यासाठी तुम्हाला आरोग्यदायी सवयी देखील असणं गरजेचं आहे. याचीच पहिली पायरी म्हणजे ‘पुरेशी झोप आणि दैनंदिन व्यायाम’ हा पहिला महत्त्वाचा मंत्र आहे. यातही व्यायाम ही पहिली पायरी आहे. दैनंदिन व्यायाम केल्यास शांत झोप लागण्यास मदत होते आणि पुरेशी झोपही घेता येते. याशिवाय पुरेशी आणि चांगली झोप घेण्यासाठी लवकर जेवण करणं आणि चहा किंवा कॉफीचं प्रमाण कमी करणं देखील गरजेचं आहे.

वयाच्या 40 नंतर दरवर्षी पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनमध्ये 1 टक्के घट
पुरुषांचं लैंगिक आरोग्य आणि त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन या हार्मोनची भूमिका महत्त्वाची असते. इथेच वयाचा लैंगिक आरोग्याशी थेट संबंध येतो. यानुसार वयाच्या 40 नंतर पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण दरवर्षी 1 टक्क्याने कमी होत जातं. तारुण्यात याच टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण पुरुषांच्या शरीरात मुबलक असतं. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी झालं की मग कामवासनेत घट होणं, शिघ्रपतन होणं अशा अनेक गोष्टी लैंगिक आरोग्य बिघडवतात. त्यामुळेच वय वाढलं की टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषधंही घेणं आवश्यक असतं.

हे ही वाचा

<

Related posts

Leave a Comment