Maratha Reservation |मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना मुस्लिम समाजाने पाठवले एक हजार पत्र
माहूर येथील मुस्लिम युवकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थिती मध्ये राबविली मोहीम! एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी’ मोहिमे अंतर्गत पंतप्रधानाला तर मुस्लिम आरक्षणासाठी मुखमंत्र्याना पाठविले पत्र! One thousand letters sent by the Muslim community to the Prime Minister for Maratha reservation
माहूर:- मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ ही मोहीम राष्ट्रवादी युवकने हाती घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजातील युवकांनी मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर मुस्लिम आरक्षणासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक हजार पत्र पाठविले आहे. One thousand letters sent by the Muslim community to the Prime Minister for Maratha reservation
‘मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक कोटी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहे. आपण सुद्धा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पत्र लिहावे, असे आवाहन राज्यातील युवकांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ व्या वर्धापन दिन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत दूध सर्करा योग साधक माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी काल दिनांक २८ रोजी परिवार संवाद यात्रेनिमित्त माहूर येथे आलेल्या प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना सोबत घेत माहूर येथील पोस्ट ऑफिस अधून आरक्षणाच्या मागणीचे पत्र पाठविले.
या वेळी मोसिन सय्यद,मोहम्मद अझरुद्दीन,रजिक शेख,आसिफ पटेल,आगा खान,तय्यब शहा, अजमोद्दीन शेख, डॉ.युसुफ,मन्सूर भाई,आरिफ भाई,साबीर सौदागर,अब्दुल रहमान शेख आली,रोमन सय्यद,माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी,नगरसेवक रफिक सौदागर, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मारोती रेकुलवार,शहर अध्यक्ष अमित येवतीकर, बंटी पाटील जोमदे,चिंटू जाधव, राजू चव्हाण,ओम पाटील, यांची उपस्थिती होती. One thousand letters sent by the Muslim community to the Prime Minister for Maratha reservation
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभारनवी दिल्ली, २६ जुलै : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेमुळे
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same state? चालू मान्सून
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना बीड लाचलुचपत

