Maratha Reservation |मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना मुस्लिम समाजाने पाठवले एक हजार पत्र

Maratha Reservation |मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना मुस्लिम समाजाने पाठवले एक हजार पत्र

माहूर येथील मुस्लिम युवकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थिती मध्ये राबविली मोहीम! एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी’ मोहिमे अंतर्गत पंतप्रधानाला तर मुस्लिम आरक्षणासाठी मुखमंत्र्याना पाठविले पत्र! One thousand letters sent by the Muslim community to the Prime Minister for Maratha reservation

माहूर:- मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ ही मोहीम राष्ट्रवादी युवकने हाती घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजातील युवकांनी मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर मुस्लिम आरक्षणासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक हजार पत्र पाठविले आहे. One thousand letters sent by the Muslim community to the Prime Minister for Maratha reservation

‘मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक कोटी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहे. आपण सुद्धा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पत्र लिहावे, असे आवाहन राज्यातील युवकांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ व्या वर्धापन दिन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत दूध सर्करा योग साधक माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी काल दिनांक २८ रोजी परिवार संवाद यात्रेनिमित्त माहूर येथे आलेल्या प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना सोबत घेत माहूर येथील पोस्ट ऑफिस अधून आरक्षणाच्या मागणीचे पत्र पाठविले.

या वेळी मोसिन सय्यद,मोहम्मद अझरुद्दीन,रजिक शेख,आसिफ पटेल,आगा खान,तय्यब शहा, अजमोद्दीन शेख, डॉ.युसुफ,मन्सूर भाई,आरिफ भाई,साबीर सौदागर,अब्दुल रहमान शेख आली,रोमन सय्यद,माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी,नगरसेवक रफिक सौदागर, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मारोती रेकुलवार,शहर अध्यक्ष अमित येवतीकर, बंटी पाटील जोमदे,चिंटू जाधव, राजू चव्हाण,ओम पाटील, यांची उपस्थिती होती. One thousand letters sent by the Muslim community to the Prime Minister for Maratha reservation

<

Related posts

Leave a Comment