अन्न धान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी- राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम

अन्न धान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी- राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम

मुंबई दि. 18 :- अन्न धान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी असे निर्देश आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिले. जळगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील 2018 मध्ये उघडकीस आलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या धर्तीवर वाहतूक ठेकेदार यांच्याशी संगनमत करून धान्यांचा काळाबाजार चालू असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी गंभीर दखल घेऊन मंत्रालयातील दालनात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन याबतीत गांभिर्याने दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. Food grain distribution system should be made transparent – Minister of State for Food and Civil Supplies

जळगाव जिल्ह्यातील वाहतूकदार यांनी गोदामांमध्ये पोहोच मालाच्या ई-1 रजिस्टर मधील अभिलेख तसेच या अभिलेखाचा विविध टोल नाक्यावरील असलेल्या नोंदी तसेच (जि पि एस ) यंत्राचा वापर वाहतूकदार नियमाप्रमाणे करत आहेत का, तसेच ठेकेदार यांची वाहने शासनाच्या निकषांची पुर्तता करतात आहेत का याबाबत संबंधित(RTO) यांचा अहवाल प्राप्त आहेत का, याचबरोर अन्न धान्य वितरण करण्यात येणाऱ्या वाहनांना नियमाप्रमाणे हिरवा रंग तसेच PDS चे फलक लावण्यात आले आहेत का, जळगाव जिल्ह्यातील धान्यांचे पुर्ण इ-पास मशिनद्वारे झाले आहेत का, आदी बाबी डॉ. कदम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जळगाव जिल्ह्यातील वरील सविस्तर बाबतीत अहवाल शासनाला तिन महिन्यात सादर करण्याचे निर्देश डॉ कदम यांनी दिले.Food grain distribution system should be made transparent – Minister of State for Food and Civil Supplies

डॉ. कदम यांनी जिल्हयामधील अन्नधान्य वाहतुकीच्या वाहनांवर शासनाच्या निर्देशाप्रमाणे जी.पी.एस. यंत्रणा बसविलेल्या नसल्याने तिव्र नाराजी व्यक्त केली. तसेच माल व्यपगत करण्याची प्रकरणे तसेच इतर बाबींवर बोट ठेवले. राज्यमंत्री यांनी पुढील 3 महिने सर्व वाहतुक व्यवस्थेवर जी.पी.एस. यंत्रणा क्षेत्राची नावे तसेच इतर सर्व माध्यमातून गैरप्रकाराबाबत तपासणी करुन शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

यावेळी या बैठकीला श्री. अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव, सह सचिव,सुधिर तुंगार, सुनील सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, श्री,प्रशांत कुलकर्णी, सहायक पुरवठा अधिकारी, आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. Food grain distribution system should be made transparent – Minister of State for Food and Civil Supplies

====================================================================================================

<

Related posts

Leave a Comment