Maharashtra Olachimb, heavy rains disrupt lifeline everywhere, the rains will continue till this day.
न्युज महाराष्ट्र व्हाईस टिम – महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत केले आहे. मुंबईतील अनेक भागात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नालासोपारा, सायन या रेल्वे स्थानकांचे रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्यात गेले आहेत. पालघरच्या साफाले नंदाडे भागात घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. इतकंच नाहीतर इथे लोकांना छतावर उभे राहण्याची वेळ आली आहे. येथून ८० जणांना वाचविण्यात आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तास मुंबई, पालघर आणि डहाणूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यावेळी सोसाट्याचा वाराही पसरेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक विभागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी गडगडाटासह, विजांचा कडकडाट व जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आधीच मुंबईत पावसामुळे हाहाकार झाला असून धोका आणखी वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. येत्या २४ तासात मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते व रेल्वेमार्गावर परिणाम होईल अशी शक्यता आहे. स्थानिक सेवेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, भरतीची तीव्रता वाढल्यामुळे शहरातही पाणी साचण्याच्या समस्या वाढू शकतात. समुद्रामध्ये भरती जास्त असल्याने रस्त्यांमधून पाणी रिकामी करण्यातही अडचणी येतील.
19 ते 22 जुलै या कालावधीसाठी मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
सातारा जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज सोमवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 8.2 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 90.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा (Weather forecast Monsoon Rain Maharashtra) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात कोकणमध्ये (Konkan) पुन्हा धो धो पाऊस (Rain) कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील 24 तासात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department (IMD) वर्तविला आहे. तर मुंबई (Mumbai Rain) , ठाणे, पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील चार दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट असणार आहे. 23 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, उपनगरांसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत.
- कोण आहे IAS पूजा खेडकर? व्हीआयपी मागण्या करणाऱ्या आयएएस प्रशिक्षणार्थीं चर्चेतमहाराष्ट्रातील 2022 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी असलेल्या पूजा खेडकर,…
- Who Is Manu Bhaker।कोन आहे मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचणारी भारताची स्टार नेमबाज30 जुलै, मंगळवार रोजी चॅटॉरॉक्स नेमबाजी केंद्रात 10 मीटर एअर पिस्तूल…
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णयमुंबई, दि. २२:- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत…
- ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णयजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबतच्या सुधारित शासन निर्णय 18 जूनला राज्य…
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 3.0 72 मंत्र्यांसह, मंत्रिमंडळात 9 नवीन चेहरे | Modi 3.0 With 72 Ministers Takes Oath, 9 New Faces In Cabinetनवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी शपथविधी सोहळ्यानंतर…