दुबार पेरणी संकटात, मदतीचा हात, ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं उपक्रम, पेरणी मोफत- डॉ. विठ्ठलराव विखेपाटील कृषी गट.

दुबार पेरणी संकटात, मदतीचा हात, ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं उपक्रम, पेरणी मोफत- डॉ. विठ्ठलराव विखेपाटील कृषी गट.

ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं उपक्रमाद्वारे दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणी मोफत.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी गटाचा शेतकर्‍यांना दिलासा देणारा उपक्रम.

नांदेड प्रतिनिधी 27 जून

मृग नक्षत्रात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली परंतु पेरणी झाल्यानंतर तब्बल दहा बारा दिवस उलटूनही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आले आहे,शेतकऱ्यांना अनेक संकटाना तोंड देत पहिलीच पेरणी केली होती परंतु आता पाऊस अभावी दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांना आली आहे,पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी गटाने निर्णय घेऊन दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ डिझेल घेऊन ट्रॅक्टरद्वारे मोफत पेरणी करून देणार असल्याचे गटाचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे.

हदगाव तालुक्यातील लिंगापूर व परिसरातील गावातील अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला पाऊस झाल्यामुळे पेरणी केली आहे, अनेक शेतामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे बियाणे उगवणशक्ती झालीच नाही यामुळे शेती मशागत याचा खर्चही वाढला अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरता पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी गटाचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी पुढाकार घेऊन आपले दोन्ही ट्रॅक्टर शेतकऱ्याचे आर्थिक ताण कमी व्हावा म्हणूनच ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे या संकल्पनेतून शेतकऱ्यांना मोफत दुबार पेरणी करून देणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा थोड्याफार प्रमाणात आर्थिक ताण कमी व्हावा त्यांना दिलासा मिळावा यासाठी हा उपक्रम लिंगापुर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली असल्याची व परिसरातील शेतकरी बांधवांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भागवत देवसरकर, सचिन देवसरकर,पवन सूर्यवंशी यांनी केले आहे.

हे लेख वाचा——————

<

Related posts

Leave a Comment