Aloe vera benefits for health महागडे कोरफड जेल घेण्यापेक्षा घरी कुंडीत लावा. वाचा कोरफड चे आरोग्यसाठी अनेक फायदे

Aloe vera benefits for health महागडे कोरफड जेल घेण्यापेक्षा घरी कुंडीत लावा. वाचा कोरफड चे आरोग्यसाठी अनेक फायदे

घरात बाग लावताना बरेच जण तुळशीच्या रोपाबरोबर कुंडीत कोरफडही लावतात. ही कोरफड एकाच वेळेस अनेक आजारांवर घरच्या घरी उपचार करते. Aloe vera benefits for health कोरफडीमध्ये औषधी गुणांचा खजिना दडलेला आहे. त्याचमुळे समस्या केसांची असो की त्वचेची, खाज असो नाही तर दाह कोरफड फार महत्त्वाची.
कोरफडीमध्ये ए, सी, बी 1, बी 2, बी 3, बी 6 आणि इ जीवनसत्त्वं असतं. काही प्रकारच्या कोरफडीमध्ये बी 12 हे जीवनसत्त्वही आढळतं. कॅल्शियम, तांबं, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंकसह एकूण वीस खनिजं कोरफडीमध्ये आढळतात. सौंदर्यप्रसाधनांच्या जगात कोरफड अतिशय लोकप्रिय आहे. त्वचा मऊ-मुलायम करणं, खाज-खरूज यापासून त्वचेचं रक्षण करणं यासाठी कोरफडीचा उपयोग आवजरून केला जातो. Aloe vera benefits for health

कोरफडीमध्ये ९९ टक्के पाण्याचा अंश असल्यानं तिचा उपयोग त्वचेवर केला तर त्वचेला मॉइश्चरायझर मिळतं. त्वचेत नवचैतन्य येऊन त्वचा टवटवीत होते. त्वचा मऊ आणि लवचिकही होते. त्वचेसाठी नियमितपणो कोरफड वापरल्यास त्वचा जास्तीत जास्त ऑक्सिजन शोषून घेऊ शकते.
कोरफडीचा उपयोग करून आपण डोक्यापासून पायाच्या टाचेर्पयतचे अनेक प्रश्न सहज सोडवू शकतो. कोरफड ही औषधी असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त तिचा उपयोग योग्य रीतीनं व्हायला हवा! Aloe vera benefits for health
मुख्य म्हणजे बाहेरून ऑलिवेरा क्रीम आणून लावण्यापेक्षा आपल्या घरातल्या कुंडीतली कोरफडच थेट लावणं उत्तम.


केसातल्या कोंडय़ावर कोरफडीचे औषध Aloe vera benefits for hair health पपईची एक फोड, र्अध केळं, पाऊण कप कोरफडीचा पाणी घालून पातळ केलेला गर, पाऊण कप खोबऱ्याचं तेल घेऊन हे सर्व साहित्य एकत्र घुसळून त्याची मऊ पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांवर लावावी. वीस मिनिटांनी सौम्य स्वरूपाचा हर्बल शाम्पू वापरून केस धुवावे. यामुळे केसांच्या मुळांचंही भरण-पोषण होतं. सोबत केस मऊ-मुलायम आणि चमकदार होतात.
ज्यांना आपल्या केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर हवं असेल त्यांनी कोरफडीचा ताजा गर काढून तो केसांना कंडिशनर म्हणून लावावा. कोरफडीचा ताजा गर हे केसांसाठी उत्तम कंडिशनर आहे.

<

Related posts

Leave a Comment