मुंबई, दि. 10 : विदर्भ व मराठवाडा विभागातील शासकीय वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे वर्ष 2020-21 या वित्तीय वर्षाचे भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरण पत्र मुख्य महालेखाकार- 2 नागपूर कार्यालयाच्या <https://agmaha.cag.gov.in/GPFNagv1.asp> ह्या लिंकवर अपलोड करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी आपले वार्षिक विवरणपत्र फक्त सेवार्थ पोर्टलमध्ये पाहण्यासाठी अथवा डाऊनलोड व प्रिन्ट काढण्यासाठी https://sevarth.mahakosh.gov.in/login.isp या लिंकवर उपलब्ध मार्गदर्शिका पुस्तिकेत पाहू शकतील. Provident Fund Annual Statement on Sevarth System
शासनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या जमा निधीची तसेच त्यांना दिलेल्या अग्रिम राशीची रक्कम एसएमएसद्वारे संदेश पाठवून कळविता येईल. ज्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक अद्यापही नोंदणीकृत झाला नसेल त्यांनी आपला मोबाईल क्रमांक fm.mh2.ae@cag.gov.in या ईमेल पत्त्यावर किंवा 09423441755 या मोबाईल क्रमांकावर संदेश (एस.एम.एस.) पाठवून नोंदणी करुन घ्यावा. Provident Fund Annual Statement on Sevarth System
सर्व कर्मचाऱ्यांनी आपले नाव, जन्म तारीख, भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र सेवार्थ प्रणालीमध्ये तपासून घ्यावे. तफावत असल्यास सेवार्थ प्रणालीमध्ये सुधारित करुन आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून दुरुस्ती करुन घ्यावी. महालेखाकार कार्यालयाच्या अभिलेख्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ-आयडी सह gpftakrarngp@gmail.comवर ईमेल पाठवावा किंवा 0712-2560484या फॅक्सवर सूचित करावे.
कर्मचारी महालेखाकार कार्यालयाच्या <https:/agmaha.cag.gov.in/> या लिंकवर नोंदणीकृत करुन भविष्य निर्वाह निधी लेख्याची सद्य:स्थिती पाहू शकतील. भविष्य निर्वाह निधी अनुसूचिमध्ये अभिदात्याचे लेखा क्रमांक, विभागाशी संबंधित सिरीज व पूर्ण नाव असल्याची कर्मचाऱ्यांनी खात्री करावी. मासिक अधिदानाची राशी किंवा घेतलेल्या अग्रिमची भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत कोषागार प्रमाणक व दिनांक, अनुसूचित प्रमाणकाची राशी, अनुसूचिबरोबर पाठवावी. जेणेकरुन नोंद न झालेले क्रेडिट व अग्रिमाची लेख्यामध्ये नोंद घेतली जाईल व सेवा निवृत्तीच्यावेळी भविष्य निर्वाह निधीची राशी प्राधिकृत करताना होणारा विलंब टाळता येईल, असे वरिष्ठ लेखाधिकारी, महालेखाकार-2 यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. Provident Fund Annual Statement on Sevarth System
- संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड समील होता ?बीड सरपंच हत्या प्रकरण: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय…
- संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडलीबीड प्रतिनिधी :- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले…
- Santosh Deshmukh Murder Case |धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे राजीनामा नाही- अजित पवारबीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…
- बीडच्या सरपंच हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्यात अटकबीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी…
- कार्यकर्ते घडवणारा कारखाना माजी आमदार स्व.प्रदीप नाईक अनंतात विलीन : कार्यकर्त्यांना अश्रू आणावरमाहुर प्रतिनिधी ( ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे ) :- मध्यानीच्या सूर्यनारायणाला साक्षी ठेवून आपल्या ”…