Kangana Ranaut : बोल्ड कंगनाचा ग्लॅमरस अवतार, नेटकऱ्यांनी करून दिली देव, देश आणि धर्माची आठवण!

Kangana Ranaut : बोल्ड कंगनाचा ग्लॅमरस अवतार, नेटकऱ्यांनी करून दिली देव, देश आणि धर्माची आठवण!

अभिनेत्री कंगना रणौत Kangana Ranaut तिच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. विविध मुद्द्यांवर कंगना तिची बेधडक मतं मांडण्यापासून घाबरत नाही. सध्या कंगना ट्विटरवर जोरदार ट्रेंड होत आहे. यामागचं कारण तिचं एखादं विधान नसून तिचे फोटो आहेत. कंगनाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमुळेच नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. या फोटोंमध्ये कंगनाचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे.

सूर्यास्ताच्या वेळी समुद्रकिनारी पोझ देतानाचे कंगनाचे हे फोटो आहेत. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ब्रालेट आणि पँट परिधान केला आहे. त्यावर गोल्डन चेन आणि बन असा तिचा लूक आहे. ‘मोहब्बत मे नही है फरक जीने और मरने का, उसी को देख कर जीते है जिस काफिर पे दम निकले’, ही गालिब यांची शायरी तिने कॅप्शनमध्ये लिहिली आहे.

बऱ्याच कालावधीनंतर कंगनाचा असा लूक चाहत्यांना पहायला मिळाला आहे. याच लूकमध्ये ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. काहींना तिचा हा लूक खूप आवडला आहे तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. ‘इतरांना शिकवण देत असतेस, मात्र स्वत: बोल्ड लूकमध्ये फोटोशूट करतेस’, अशा शब्दांत काहींनी तिला सुनावलं. ‘तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती’, अशी कमेंट एकाने लिहिली आहे. तर ‘तुझ्या सभ्य सनातन महिलेच्या इमेजला धक्का देणारा हा लूक आहे’, असं दुसऱ्याने लिहिलं.कंगनाच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘धाकड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली. या चित्रपटात कंगनाचा अॅक्शन अवतार पहायला मिळणार आहे.

=============================================================================================

<

Related posts

Leave a Comment