‘Jai Bhim’ nominated for Oscar
एखाद्या सिनेमाला पुरस्कारानं गौरविलं जाणं ही खूप मानाची गोष्ट. पण अनेकदा चांगले सिनेमे या पुरस्कारांपासून वंचित राहतात किंवा अनेक कलाकारांच्या बाबतीतही असे घडताना आपण पाहिलं असेल. पण प्रेक्षकांपासून समिक्षकांपर्यंत साऱ्यांनीच गौरविलेल्या सिनेमाला जगातील सगळ्यात मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळतं तेव्हा तो आनंद काही औरच असतो. त्यात जगात नंबर वनच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी जर नामांकन मिळत असेल तर त्या सिनेमाचा मान हा कैकपटीनं वाढतो. त्यात आपल्या भारतातून एखादा सिनेमा ऑस्करसाठी निवडला जावा हा तर समस्त भारतवासियांसाठी आनंदाचा क्षण. ‘Jai Bhim’ nominated for Oscar
असाच एक भारतभर चर्चा झालेला टी.जे.ज्ञानवेल दिग्दर्शित जय भीम(Jay Bhim) या सिनेमाचा डंका आता परदेशातही वाजतोय. ‘जय भीम’ सिनेमा आता थेट ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. जय भीमसोबत प्रियदर्शन दिग्दर्शित ‘मरक्कर’ या दाक्षिणात्य सिनेमाचादेखील 94 व्या ऑस्कर (Oscar Award) पुरस्कार स्पर्धेत प्रवेश झाला आहे. जय भीम सिनेमाने अतिशय वेगळ्या आणि दुर्लक्षित अशा विषयाला हाताळलेले आहे. याच कारणामुळे या सिनेमाची देशभरात चर्चा झाली. मात्र आता हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला असून हेच या सिनेमाचे यश आहे, असे म्हटले जात आहे. ‘Jai Bhim’ nominated for Oscar
यावेळी जगभरातील 276 चित्रपट ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी खुल्या विभागात स्पर्धेत आहेत. या यादीत ‘जय भीम’ आणि ‘मरक्कर’ सिनेमांचाही समावेश आहे. ‘जय भीम’ हा तमिळ सिनेमा भारतात 2 नोव्हेंबर 2021 रोजी ओटीटीवर प्रदर्शित झालेला आहे. चित्रपटाचे कथानक 90 च्या दशकातील तमिळनाडूमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. दाक्षिणात्य अभिनेता ‘सूर्या’ यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. प्रदर्शनानंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राजकीय वादालाही या चित्रपटाला तोंड द्यावे लागले होते. तमिळनाडूतील आदिवासींना न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाची ही कथा आहे.
तसेच प्रियदर्शन दिग्दर्शित आणि मोहनलाल अभिनित ‘मरक्कर’ या राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार विजेत्या सिनेमाचाही ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत समावेश झाला आहे. खुल्या विभागात निवड झालेल्या 276 सिनेमांची यादी ऑस्करच्या संकेतस्थळावर गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात या दोन्ही चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांची अंतिम यादी 8 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहेत. ‘Jai Bhim’ nominated for Oscar
==========================
- खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन; कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुक
- संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड समील होता ?
- संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडली
- Santosh Deshmukh Murder Case |धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे राजीनामा नाही- अजित पवार
- बीडच्या सरपंच हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्यात अटक