बीडच्या परळीत तरुणाला पेट्रोल पंपावरुन अपहरण करून जंगलात नेलं व जबर मारहाण केली; मुंडे कनेक्शन समोर
परळी- बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे देशभरात कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. कारण बीडमध्ये (Beed Crime) पुन्हा एकदा एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या (Santosh Deshmukh Murder Case) कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत. In Parli, a young man was picked up from a petrol pump, taken to the forest and severely beaten.
परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे या तरूणाचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले. याठिकाणी समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराज दिवटेला लाठ्याकाठ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शिवराज दिवटे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला परळी येथून अंबाजोगाईच्या स्वराची रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. In Parli, a young man was kidnapped from a petrol pump, taken to the forest and brutally beaten.
या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता बीड पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. स्व.सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतरही बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे. शिवराज दिवटे याला अशीच जबर मारहाण होत असल्याचं व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा खळबळ माजली आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat) यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी बीड जिल्ह्यात गुन्हेगारी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. त्यादृष्टीने पोलिसांना मोकळीक देण्याची भाषाही त्यांनी केली होती. मात्र, अजित पवारांसारखा खमका आणि प्रशासनावर घट्ट पकड असलेला नेता पालकमंत्री असूनही बीडमधील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. In Parli, a young man was kidnapped from a petrol pump, taken to the forest and brutally beaten.