महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात अपशकून उष्माघाताने आठ ते दहा जणांचा बळी अजून काहीजण अत्यवस्थ

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात अपशकून उष्माघाताने आठ ते दहा जणांचा बळी अजून काहीजण अत्यवस्थ

मुंबईः आज नवी मुंबईतल्या खारघर येथे राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे काहीजण अत्यवस्थ झाले. दुर्दैवाने या घटनेत सात ते आठ जणांचा मृत्यू झाला आहे. Eight to ten people died due to heat stroke in Maharashtra Bhushan program and some others are in critical condition

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी एमजीएम रुग्णालयात जावून सर्व माहिती घेतली. त्यानंतर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याचं जाहीर केलं. Eight to ten people died due to heat stroke in Maharashtra Bhushan program and some others are in critical condition

यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या २४ लोकांवर उपचार सुरु आहेत. उपाचराचा पूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. झालेली घटना दुर्दैवी आणि दुःखद आहे. रुग्णांना चांगल्यात चांगले उपचार देण्याच्या सूचन दिल्याचं त्यांनी सांगितलं.दरम्यान, आज खारघरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर श्री सेवकांची उपस्थिती होती.

दुर्दैवाने उपस्थितांपैकी काही श्री सेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सध्या इतर श्री सेवकांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचं शिंदेंनी सांगितलं. Eight to ten people died due to heat stroke in Maharashtra Bhushan program and some others are in critical condition

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice