• पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश
• मार्च ते सप्टेंबर 2021 कालावधीत एकुण 455 कोटी 72 लाख निधी सर्व तालुक्यांना
नांदेड, दि. 3 (जिमाका) :- अतिवृष्टी व निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वत: जिल्ह्यातील विविध गावात नुकसानग्रस्त क्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन धिर दिला होता. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आज त्यांनी आढावा बैठक घेतली. यात मार्च ते सप्टेंबर 2021 या कालवधीत एकुण 455 कोटी 72 लाख इतका निधी सर्व तालुक्यांना वितरीत करुन वितरणाची कार्यवाही आजपासून सुरू केली. Directed to distribute Rs. 455 crore to the farmers affected by heavy rains in Nanded district
यात मार्च, एप्रिल व मे 2021 या कालावधीत झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 लाख 65 हजार 760 रुपयांचा, माहे जुलै 2021 साठी 71 हजार 221 बाधित शेतकऱ्यांच्या एकुण 44 हजार 609.60 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी एकुण 30 कोटी 35 लाख 46 हजार 280 रुपये तर माहे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत 7 लाख 90 हजार 535 बधित शेतकऱ्यांच्या एकुण 5 लाख 61 हजार 719.29 हेक्टर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 291 कोटी 79 लाख 90 हजार 370 व वाढीव प्रमाणे 133 कोटी 56 लाख 81 हजार 242 असे एकुण 425 कोटी 36 लाख 71 हजार 613 रुपये निधी वितरीत केला आहे. Directed to distribute Rs. 455 crore to the farmers affected by heavy rains in Nanded district
माहे मार्च ते मे 2021 या कालावधीत तालुकानिहाय वितरीत केलेला निधी पुढीलप्रमाणे आहे. नांदेड तालुक्यात एका शेतकऱ्याच्या 0.30 हेक्टर आर क्षेत्रासाठी 5 हजार 400 रुपये, कंधार तालुक्यात 47 शेतकऱ्याच्या 37.66 हेक्टर आर क्षेत्रासाठी 6 लाख 77 हजार 880, लोहा तालुक्यात 37 शेतकऱ्याच्या 44.4 हेक्टर आर क्षेत्रासाठी 7 लाख 39 हजार 800, बिलोली तालुक्यात 2 शेतकऱ्याच्या 1 हेक्टर आर क्षेत्रासाठी 6 हजार 800, मुखेड तालुक्यात 6 शेतकऱ्याच्या 6 हेक्टर आर क्षेत्रासाठी 10 लाख 8 हजार, धर्माबाद तालुक्यात 40 शेतकऱ्याच्या 30 हेक्टर आर क्षेत्रासाठी 40 लाख 5 हजार, हदगाव तालुक्यात 28 शेतकऱ्याच्या 15.88 हेक्टर आर क्षेत्रासाठी 1 लाख 17 हजार 480, हिमायतनगर 1 शेतकऱ्याच्या 0.30 हेक्टर आर क्षेत्रासाठी 5 हजार 400 असे एकुण 20 लाख 65 हजार 760 रुपये मदत निधी वितरीत करण्यात आली. Directed to distribute Rs. 455 crore to the farmers affected by heavy rains in Nanded district
जुलै 2021 या महिन्यात तालुक्यानिहाय वितरीत केलेला निधी पुढीलप्रमाणे आहे. नांदेड तालुक्यात 5 हजार 174 शेतकऱ्यांच्या 1 हजार 322 हेक्टर आर क्षेत्रासाठी 89 लाख 89 हजार 600 रुपये, कंधार तालुक्यात 773 शेतकऱ्याच्या 159 हेक्टर आर क्षेत्रासाठी 10 लाख 81 हजार 200 रुपये, लोहा तालुक्यात 5 हजार 200 शेतकऱ्याच्या 1 हजार 30 हेक्टर आर क्षेत्रासाठी 70 लाख 4 हजार, बिलोली तालुक्यात 13 हजार 603 शेतकऱ्याच्या 7 हजार 534 हेक्टर आर क्षेत्रासाठी 5 कोटी 12 लाख 31 हजार 200, नायगाव तालुक्यात 895 शेतकऱ्याच्या 388 हेक्टर आर क्षेत्रासाठी 26 लाख 38 हजार 400, देगलूर तालुक्यात 11 हजार 835 शेतकऱ्याच्या 9 हजार 945 हेक्टर आर क्षेत्रासाठी 6 कोटी 76 लाख 26 हजार, भोकर तालुक्यात 1 हजार 585 शेतकऱ्याच्या 1 हजार 175.20 हेक्टर आर क्षेत्रासाठी 81 लाख 2 हजार 580, धर्माबाद तालुक्यात 494 शेतकऱ्याच्या 307 हेक्टर आर क्षेत्रासाठी 20 लाख 87 हजार 600, उमरी तालुक्यात 221 शेतकऱ्याच्या 153 हेक्टर आर क्षेत्रासाठी 10 लाख 40 हजार 400 रुपये, हिमायतनगर तालुक्यात 188 शेतकऱ्याच्या 167.40 हेक्टर आर क्षेत्रासाठी 9 लाख 37 हजार रुपये, किनवट तालुक्यात 31 हजार 253 शेतकऱ्याच्या 22 हजार 459 हेक्टर आर क्षेत्रासाठी 15 कोटी 28 लाख 8 हजार 300 रुपये असे एकुण 30 कोटी 35 लाख 46 हजार 280 रुपये मदत निधी तालुक्यांना वितरीत केला आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालवधीत नांदेड तालुक्यात 36 हजार 920 शेतकऱ्यांच्या 21 हजार 838.20 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 11 कोटी 26 लाख 28 हजार 430 वाढीव प्रमाणे 5 कोटी 25 लाख 2 हजार 70 असे एकुण 16 कोटी 51 लाख 30 हजार 500 रुपये. Directed to distribute Rs. 455 crore to the farmers affected by heavy rains in Nanded district
अर्धापूर तालुक्यात 32 हजार 412 शेतकऱ्यांच्या 22 हजार 636 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 11 कोटी 58 लाख 98 हजार 550 वाढीव प्रमाणे 5 कोटी 44 लाख 15 हजार 200 असे एकुण 17 कोटी 3 लाख 13 हजार 750 रुपये.
कंधार तालुक्यात 74 हजार 28 शेतकऱ्यांच्या 50 हजार 623 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 25 कोटी 82 लाख 84 हजार 700 वाढीव प्रमाणे 12 कोटी 15 लाख 7 हजार 800 असे एकुण 37 कोटी 97 लाख 92 हजार 500 रुपये.
लोहा तालुक्यात 1 लाख 12 हजार 762 शेतकऱ्यांच्या 57 हजार 232 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 29 कोटी 53 लाख 50 हजार 450 वाढीव प्रमाणे 13 कोटी 64 लाख 77 हजार 50 असे एकुण 43 कोटी 18 लाख 27 हजार 500 रुपये.
बिलोली तालुक्यात 45 हजार 527 शेतकऱ्यांच्या 34 लाख 491.10 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 17 कोटी 64 लाख 14 हजार 250 वाढीव प्रमाणे 8 कोटी 27 लाख 37 हजार असे एकुण 25 कोटी 91 लाख 51 हजार 250 रुपये.
नायगाव तालुक्यात 53 हजार 948 शेतकऱ्यांच्या 42 हजार 503 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 21 कोटी 93 लाख 38 हजार 100 वाढीव प्रमाणे 10 कोटी 13 लाख 54 हजार 400 असे एकुण 32 कोटी 6 लाख 92 हजार 500 रुपये.
देगलूर तालुक्यात 50 हजार 302 शेतकऱ्यांच्या 35 हजार 849 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 18 कोटी 39 लाख 85 हजार 650 वाढीव प्रमाणे 8 कोटी 57 लाख 44 हजार 350 असे एकुण 26 कोटी 97 लाख 30 हजार रुपये.
मुखेड तालुक्यात 80 हजार 277 शेतकऱ्यांच्या 58 हजार 464 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 29 कोटी 87 लाख 87 हजार 100 वाढीव प्रमाणे 14 कोटी 3 लाख 45 हजार 400 असे एकुण 43 कोटी 91 लाख 32 हजार 500 रुपये.
भोकर तालुक्यात 40 हजार 732 शेतकऱ्यांच्या 37 हजार 310.50 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 19 कोटी 3 हजार 800 वाढीव प्रमाणे 8 कोटी 95 लाख 32 हजार 450 असे एकुण 27 कोटी 98 लाख 66 हजार 250 रुपये.
मुदखेड तालुक्यात 30 हजार 33 शेतकऱ्यांच्या 22 हजार 355 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 11 कोटी 96 लाख 42 हजार 400 वाढीव प्रमाणे 5 कोटी 23 लाख 32 हजार 600 असे एकुण 17 कोटी 19 लाख 75 हजार रुपये.
धर्माबाद तालुक्यात 37 हजार 286 शेतकऱ्यांच्या 25 हजार 90 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 12 कोटी 81 लाख 56 हजार 700 वाढीव प्रमाणे 6 कोटी 1 लाख 75 हजार 800 असे एकुण 18 कोटी 83 लाख 32 हजार 500 रुपये.
उमरी तालुक्यात 33 हजार 652 शेतकऱ्यांच्या 33 हजार 766 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 20 कोटी 52 लाख 5 हजार 775 वाढीव प्रमाणे 7 कोटी 26 लाख 65 हजार 475 असे एकुण 27 कोटी 78 लाख 71 हजार 250 रुपये.
हदगाव तालुक्यात 82 हजार 532 शेतकऱ्यांच्या 50 हजार 2 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 25 कोटी 50 लाख 10 हजार 200 वाढीव प्रमाणे 12 कोटी 4 हजार 800 असे एकुण 37 कोटी 50 लाख 15 हजार रुपये.
हिमायतनगर तालुक्यात 32 हजार 333 शेतकऱ्यांच्या 21 हजार 834.60 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 11 कोटी 14 लाख 59 हजार 975 वाढीव प्रमाणे 5 कोटी 23 लाख 76 हजार 675 असे एकुण 16 कोटी 38 लाख 36 हजार 750 रुपये.
किनवट तालुक्यात 22 हजार 717 शेतकऱ्यांच्या 34 हजार 94 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 17 कोटी 79 लाख 29 हजार 600 वाढीव प्रमाणे 8 कोटी 7 लाख 95 हजार 400 असे एकुण 25 कोटी 87 लाख 35 हजार रुपये.
माहूर तालुक्यात 25 हजार 74 शेतकऱ्यांच्या 13 हजार 630.89 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 6 कोटी 95 लाख 54 हजार 609 वाढीव प्रमाणे 3 कोटी 27 लाख 14 हजार 762 असे एकुण 10 कोटी 22 लाख 69 हजार 363 रुपये निधी वाटप आहे.
अतिवृष्टीमुळे व निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात वितरीत करण्यात आलेला निधी बाधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना जिल्हा प्रशासनातर्फे दिले आहेत. Directed to distribute Rs. 455 crore to the farmers affected by heavy rains in Nanded district
==============================
- कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biography
- Big Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे?
- सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ
- Badlapur sexual assault accused Akshay Shinde police encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटर