राहुरी (जि. नगर) ः पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी कापुस लागवड, पेरणीची तयारी केलीय. चांगला व पुरेसा पाऊस झाला तर 15 जूनपर्यत बीटी कापसाची लागवड करायला हरकत नाही असा सल्ला राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागाने दिलाय.
खरिप हंगाम सुरुच होतोय. खरिपात बहूतांश शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, तुर, उडीद, मुग, भुईमुग, मका ची पेरणी करतात. सध्या शेतकऱी खरिपाची तयारी करत आहेत. अजून मान्सुनचा पाऊस यायचाय, पण पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पुर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.
चांगला पाऊस पडला तर बीटी कापसाची लागवड करायला हरकत नाही. कापुस लागवड 90 बाय 90 सेंटीमीटर किंवा 120 बाय 60 सेंटींमीटर अंतरावर लागवड करावी. हेक्टरी 10 टन शेणखत घालावे. रसशोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी रस शोषणार्या किडींच्या नियंत्रणासाठी कपाशीभोवती एक मीटर अंतरावर मका व चवळीची एका आड एक लागवड करावी. तसेच कपाशीच्या प्रत्येक ९ व्या ओळीच्या दुसर्या बाजूस मका, चवळी व राळा या पिकांची लागवड करावी.
पावसात घ्या काळजी
पावसाची शक्यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत. वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने, फळ पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काठ्याचा आधार देऊन प्लॅस्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत जनावराना उघड्यावर चरावयास पाठवु नये, तसेच त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे तसेच झाडाखाली बांधु नयेत. जनावरे गोठ्यात बांधावीत आणि चारा उपलब्ध करुन द्यावा.
शेडमध्ये पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चार्यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देवु नये. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अॅपचा वापर करावा. वीजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा असे विद्यापीठाने सांगितलेय.
हे ही वाचा :
- पुन्हा आलो, देवाभाऊच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भाजपच्या बैठकीत नाव निश्चितभारताच्या आर्थिक राजधानीत महायुती युती पुन्हा सत्तेवर आल्यानंतर अनेक दिवसांच्या सस्पेन्सचा शेवट करून बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण भाजपच्या बैठकीत एकमत झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र…
- Maharashtra Assembly Election 2024 | मोदीजी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मुख्यमंत्रीपदापासून एकनाथ शिंदेंची माघार की मजबुरी?मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला पाच दिवस उलटूनही महायुतीला अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करता आलेली नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
- लाडके भाऊच पुन्हा सत्तेवर, महायुती 230 जागा जिंकून प्रचंड बहुमतात विजयी..राज्यातील जनतेने आज सत्ताधारी महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले. महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधाण झाली असून विधानसभेच्या २८८ पैकी २३१ पेक्षा अधिक जागा…
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिकाकालिचरण महाराज छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले. ते असे म्हणाले आता एक आंदोलन सुरु झालं…
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.मुंबई : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठीच्या निवडणूक प्रचाराचा आज सोमवारी शेवटचा दिवस आहे. ही मोहीम सायंकाळी ५ वाजता थांबली. या जागांसाठी बुधवार 20…