राहुरी (जि. नगर) ः पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी कापुस लागवड, पेरणीची तयारी केलीय. चांगला व पुरेसा पाऊस झाला तर 15 जूनपर्यत बीटी कापसाची लागवड करायला हरकत नाही असा सल्ला राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागाने दिलाय.
खरिप हंगाम सुरुच होतोय. खरिपात बहूतांश शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, तुर, उडीद, मुग, भुईमुग, मका ची पेरणी करतात. सध्या शेतकऱी खरिपाची तयारी करत आहेत. अजून मान्सुनचा पाऊस यायचाय, पण पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पुर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.
चांगला पाऊस पडला तर बीटी कापसाची लागवड करायला हरकत नाही. कापुस लागवड 90 बाय 90 सेंटीमीटर किंवा 120 बाय 60 सेंटींमीटर अंतरावर लागवड करावी. हेक्टरी 10 टन शेणखत घालावे. रसशोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी रस शोषणार्या किडींच्या नियंत्रणासाठी कपाशीभोवती एक मीटर अंतरावर मका व चवळीची एका आड एक लागवड करावी. तसेच कपाशीच्या प्रत्येक ९ व्या ओळीच्या दुसर्या बाजूस मका, चवळी व राळा या पिकांची लागवड करावी.
पावसात घ्या काळजी
पावसाची शक्यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत. वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने, फळ पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काठ्याचा आधार देऊन प्लॅस्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत जनावराना उघड्यावर चरावयास पाठवु नये, तसेच त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे तसेच झाडाखाली बांधु नयेत. जनावरे गोठ्यात बांधावीत आणि चारा उपलब्ध करुन द्यावा.
शेडमध्ये पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चार्यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देवु नये. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अॅपचा वापर करावा. वीजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा असे विद्यापीठाने सांगितलेय.
हे ही वाचा :
- जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजनAnnual gathering along with parents’ meet, child marriage awareness program organized at Kasturba Gandhi Vidyalaya in Jalna city न्युज प्रतिनिधी | जालना शहरातील…
- अंजली बदनामिया यांनी माझ्यावर केलेले कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे आरोप खोटे धनंजय मुंडे यांचा पलटवारमार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे…
- Anjali Damania On Dhananjay Munde|धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री काळात मोठा भ्रष्टाचार, अव्वाच्या सव्वा किमतीला वस्तू खरेदी करून शासनाला 245 कोटींचा चुनाAnjali Damania On Dhananjay Munde| Big corruption during Dhananjay Munde’s agriculture minister, 245 crores lime to the government by buying goods at twice…
- Beed DPDC Meeting News | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठकजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार गुरुवारी सकाळी बीडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी परळी येथील राष्ट्रवादी कार्यालयात मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार…
- What is the Eighth Pay Commission? वेतन, भत्ते आणि पेन्शन लाभ मध्ये सुधारणाचा उद्देश आहे.आठवा वेतन आयोग म्हणजे काय? ८वा वेतन आयोग हा भारतातील एक प्रस्तावित आयोग आहे जो सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (CGE) वेतन, भत्ते आणि…