राहुरी (जि. नगर) ः पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी कापुस लागवड, पेरणीची तयारी केलीय. चांगला व पुरेसा पाऊस झाला तर 15 जूनपर्यत बीटी कापसाची लागवड करायला हरकत नाही असा सल्ला राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागाने दिलाय.
खरिप हंगाम सुरुच होतोय. खरिपात बहूतांश शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, तुर, उडीद, मुग, भुईमुग, मका ची पेरणी करतात. सध्या शेतकऱी खरिपाची तयारी करत आहेत. अजून मान्सुनचा पाऊस यायचाय, पण पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पुर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.
चांगला पाऊस पडला तर बीटी कापसाची लागवड करायला हरकत नाही. कापुस लागवड 90 बाय 90 सेंटीमीटर किंवा 120 बाय 60 सेंटींमीटर अंतरावर लागवड करावी. हेक्टरी 10 टन शेणखत घालावे. रसशोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी रस शोषणार्या किडींच्या नियंत्रणासाठी कपाशीभोवती एक मीटर अंतरावर मका व चवळीची एका आड एक लागवड करावी. तसेच कपाशीच्या प्रत्येक ९ व्या ओळीच्या दुसर्या बाजूस मका, चवळी व राळा या पिकांची लागवड करावी.
पावसात घ्या काळजी
पावसाची शक्यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत. वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने, फळ पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काठ्याचा आधार देऊन प्लॅस्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत जनावराना उघड्यावर चरावयास पाठवु नये, तसेच त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे तसेच झाडाखाली बांधु नयेत. जनावरे गोठ्यात बांधावीत आणि चारा उपलब्ध करुन द्यावा.
शेडमध्ये पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चार्यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देवु नये. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अॅपचा वापर करावा. वीजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा असे विद्यापीठाने सांगितलेय.
हे ही वाचा :
- कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biographyनिक्की तांबोळी ही एक भारतीय अभिनेत्री आहे तिचा जन्म 21 ऑगस्ट 1996 एका हिंदू मराठी कुटुंबात गृहिणी आई प्रमिला बोडखे तांबोळी आणि सेल्स…
- Big Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे?बारामती तालुक्यातील मोडवे नावाच्या एका छोट्याशा गावाचा सूरज चव्हाण. सूरजचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबातला. लहानपणीच सूरजला त्याचे आईवडील सोडून गेले. सूरजचे वडील वारले,…
- सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?Crew-9 मिशन हे NASA च्या कमर्शियल Crew प्रोग्रामचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखले जाते आणि SpaceX च्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवव्या रोटेशनला सूचित…
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी आता उपोषण…
- Badlapur sexual assault accused Akshay Shinde police encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटरमहाराष्ट्रातील बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अक्षय शिंदे या व्यक्तीने सोमवारी एका अधिकाऱ्याचे शस्त्र हिसकावून पोलिसांवर गोळीबार…