Corona Third Wave Dangerous | संभाव्य तिसरी लाट – बालकांवर परिणाम- समज गैरसमज

Corona Third Wave Dangerous | संभाव्य तिसरी लाट – बालकांवर परिणाम- समज गैरसमज

बर्‍याच संशोधकांच्या मते आपल्या भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता सांगितले आहे व ही लाट लहान मुलांमध्ये पसरण्याची शक्यता आहे अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. Corona Third Wave Dangerous for Teenagers
हा केवळ अंदाज आहे. परंतु दुर्दैवाने असे झालेच तर आपण तयार असले पाहिजे.त्यासाठी काही सूचना पालकांनी पाळल्या तर कदाचित लहान मुलांमध्ये होणारा कोरोना वेळीच नियंत्रणात येईल. Corona Third Wave Dangerous for Teenagers

 1. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्क वापरणे,वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सींग पाळणे , गर्दीत जाणे टाळले पाहिजे.
 2. कुठल्याही प्रकारचा ताप अंगावर न काढता लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे.
 3. पालकांकडून कोरोना प्रतिबंधक उपाय पाळणे गरजेचे असून आपल्या पाल्यांना त्याविषयी मार्गदर्शन केले पाहिजे.
 4. बालकांमध्ये हा आजार झाल्यास 90% बालकांमध्ये सौम्य लक्षणे असतील. 5-7%बालकांमध्ये मध्यम लक्षणे असतील व केवळ 3-5%बालकांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे असतील.
 5. 0 ते 5 वयोगटातील बालकांना
  Influenza vaccination करून घ्यावे.यामुळे दरवर्षी होणारा influenza आजार तर टाळता येईल त्याचबरोबर बर्‍याच प्रमाणात covid पण टाळता येईल.
 6. मुलांना सकस आहार ( प्रथिनयुक्त, जीवन सत्वयुक्त )
 7. शक्य तितके हलके शारीरिक व्यायाम करण्यास प्रोत्साहित करावे.घरातील अंगणात किंवा terrace वर.
 8. मुलांचे इतर लसीकरण वयाप्रमाणे सुरळीत चालू ठेवावे.

M I S – C

हा एक नवीन आजार आहे. यासाठी पालकांनी सतर्क राहाणे गरजेचे आहे. Corona Third Wave Dangerous for Teenagers
ज्या बालकांना कोरोना झालेला असेल किंवा घरातील इतर व्यक्तींना कोरोना झालेला असेल त्यानंतर 2 ते 6 आठवड्यानंतर हा आजार होऊ शकतो.

 1. 1.तीव्र ताप ( >100°F)
 2. अंगावर लाल पूर्ण.
 3. डोळे लाल होणे
 4. संडास, उलटी,पोटदुखी
  अशा प्रकारचे लक्षणे असतील तर त्वरित बालकांना तज्ञांकडे घेऊन जाणे.हा आजार covid होऊन गेल्यानंतर होतो.
 • हा आजार तीव्र झाल्यास Heart
  Liver
  Kidney
  Brain इ. अवयवांना धोका पोहोचवू शकतो.व हा आजार गुंतागुंतीचा होउन प्रसंगी जीवघेणा ठरु शकतो. म्हणून Covid झालेल्या किंवा post covid संपर्कात येणाऱ्या बालकांमध्ये वरीलप्रमाणे लक्षणे असतील तर त्वरित तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावे व संभाव्य आजार टाळावा.

डॉ. आनंद जाधव बालरोगतज्ज्ञ हाळीकर हॉस्पीटल, देगलूर 9422173492

घरी रहा सुरक्षित रहा……………………………….

<

Related posts

Leave a Comment