मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतिगृहे सज्ज
मुंबई, दि. 2 : मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांची पूर्तता होत आली असून मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय काढण्यात आले आहेत. तसेच उर्वरित प्रलंबित विषयांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांसाठी 14 ठिकाणी वसतिगृहे तयार असून स्थानिक पालकमंत्र्यांच्या हस्ते लवकरच त्यांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज येथे दिली. Hostels ready for Maratha students at 14 places
मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपसमितीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रत्यक्ष तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विकास रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात 23 ठिकाणी वसतीगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी 14 ठिकाणी वसतीगृहासाठी इमारती तयार असून त्याचे लवकरच उद्घाटन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई व मुंबई उपनगर, पुणे, सातारा, मिरज, कोल्हापूर, बीड, लातूर, अमरावती, नागपूर येथे प्रत्येकी एक आणि नाशिक व औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन वसतीगृहांचा समावेश आहे. उर्वरित ठिकाणी वसतीगृह सुरू करण्यासंदर्भात जागा उपलब्धतेसाठी महसूल मंत्री हे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. Hostels ready for Maratha students at 14 places
=======================================================================================================
- बिग बॉस मराठी ६ मध्ये नवा ‘सुरज चव्हाण’ स्टाइल अंडरडॉग: जालन्याचा छोटा डॉन प्रभू शेळके! थॅलेसेमियाशी झुंज देत मेहनतीने घरात दाखलप्रभू शेळके हा बिग बॉस मराठी सीझन ६ मधील एक अत्यंत चर्चेत असलेला
- स्टार्सचा महासंग्राम! बिग बॉस ६ “रितेश देशमुखचा लयभारी अंदाज! १७ सुपरस्टार्स घरात, कोण जिंकेल १ कोटी?बिग बॉस मराठी ही मराठी भाषेतील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही शो आहे, जी
- सावधान! WhatsApp APK स्कॅम: एक क्लिक आणि बँक खाते रिकामे – महाराष्ट्रात वाढत्या तक्रारीप्रिय वाचकांनो, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅपवर विविध नावाने APK File” प्राप्त होतात तेव्हा त्यात
- मुंबईत ठाकरेच पाहिजेत ? ठाकरे बंधू एकत्र येण्याविषय मनोज जरांगे पाटील यांच वक्तव्य ऐन महानगर पालिका निवडणुकीत चर्चेतमुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती
- गोड साखरेची कडू कहानी पत्नीच्या फेसबुक लाईव्ह चालू असताना नवऱ्याचा दुर्दैवी अंत निष्ठुर नियतीने 3 चिमुकल्यांचा बाप तर वृद्ध मायबापाचा आधार हिरावला…“टिचभर पोटाच्या खळगीची भिषण करुण कहानीचा दुर्दैवी अंत” The bitter story of sweet

