क्रांतिसिंह नाना पाटील Krantisinh Nana Patil हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी नेते होते. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी krantisinh nana patil birth anniversary येडेमच्छिंद्र, सांगली येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्य लढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.
१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नानांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.
ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नानांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी १९४२ च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्या सावकारांना-पाटलांना कडक शिक्षा-अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला. १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले. जंगजंग पछाडले, पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. राजकारणातून समाजकारण १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते. अशा या महान क्रांतिकारकाचे 6 डिसेंबर 1976 रोजी निधन झाले. krantisinh nana patil
====================================================================================
- संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे..सदरील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील घटनेला आज 15 16 दिवस होऊनह मुख्य … Read more
- किनवट जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी घोषणेची प्रतिक्षा…The issue of Kinwat district creation is under discussion again! Waiting for the … Read more
- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाबीड दि.२८ (प्रतिनिधी)- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना … Read more
- निरोगी आणि मजबूत जगण्यासाठी योग्य आहार आणि योग्य जीवनशैली जगण्यासाठी हे करून बघा..।दीर्घायुष्य या विषयावर प्रश्न विचारल्यावर चित्रपट रसिकांना ‘आनंद’ मधील “जिंदगी बडी होनी चाहिये … Read more
- महाराष्ट्र विधिमंडळ सन २०२४ चे हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले; प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले, 13 विधेयके संमत – वाचा मंजूर विधेयके व सविस्तर कामकाजविधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे … Read more