पुणे : सततच्या प्रतिक्षेनंतर मोसमी पाऊस अखेर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झाला आहे. आज रविवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अलिबाग, सातारा, पुणे भागात मोसमी पाऊस पोचला. देशात पश्चिम बंगाल, ईशान्य भारतातील सिक्कीमपर्यत हा पाऊस पोचला असल्याचे हवामान खात्याने सांगितले. दरम्याण चोवीस तासाच महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
पावसाळा सुरु झाला की साधारण 7 जुनला पाऊस सुरुच होतो असा जुन्या काळात कयास होता. त्याच अनुषंगा खरिपातील पेरणीची तयारी केली जायची. मोसमी पावसाचा हा सामान्य जाणकार शेतकऱ्यांचा अंदाजही खरा ठरायचा. आलिकडच्या काही वर्षात मात्र हे अंदाज चुकु लागले आहेत.
यावर्षी मोसमी पाऊस २१ मे रोजी अंदमान बेटांवर यंदा एक दिवस उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले होते. त्यानंतर नियमित वेळेच्या (१ जून) दोन दिवस उशिराने दक्षिण केरळात दाखल झाला. अरबी समुद्राकडून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली.
नेहमीपेक्षा चार दिवस आधीच म्हणजे आज रविवारी पुण्यात हजेरी लावली. मुंबईत मात्र अद्यापही मॉन्सून दाखल झालेला नाही. पुण्यासह मुंबईत मॉन्सून साधारणतः १० जून रोजी दाखल होतो असा अलिकडचा अनुभव आहे, देशातही रविवारी कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम पर्यत मोसमी पाऊस पोचला आहे. मोसमी पाऊस दाखल होत असल्याच्या हवामान खात्याच्या वार्तेने शेतकरी खुश झाले आहेत. आता बहूतांश ठिकाणी पेरणीची तयारी सुरु आहे.
- Samagra Shiksha Contract Employee Regular |समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सरकारच्या आश्वासनाने स्थगित, तीन महिन्याच्या आत कायम करणार?समग्र शिक्षा हे केंद्र शासनाची शिक्षण विभागात चालणारी महत्त्वपूर्ण योजना असून या मार्फत अनेक उपक्रम चालतात सदरील योजना…
- India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागाभारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २१,४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.…
- लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणामुंबई, दि. ०७: कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात…
- शिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.ज्या इतिहासापासून या देशातील महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा मिळते जीवन जगण्याला, राष्ट्राला, सैन्याला ऊर्जा मिळते. असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या…
———–