भारतीय स्टेट बँकेचा सायबर फसवणूक  न होण्यासाठी सांगितले आठ सुरक्षा उपाय सुरक्षा

भारतीय स्टेट बँकेचा सायबर फसवणूक न होण्यासाठी सांगितले आठ सुरक्षा उपाय सुरक्षा

नवी दिल्ली | भारतीय स्टेट बँकेत आपले खाते असणाऱ्या देशातील सर्व ग्राहकांना बँकेने आपल्या खात्यावरील पैसे सुरक्षित ठेवण्यास संदर्भात विशेष माहिती दिली आहे. या माहितीमुळे आपली सायबर फसवणूकची पूर्णपणे बंद होऊ शकते. यासंदर्भात बँकेने सांगितले आहे की, खातेदाराने भारतीय स्टेट बँकेकडे आपल्या पैशाची गुंतवणूक करावी आपल्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी बँकेने एकूण आठ उपाय सांगितलेले आहेत. त्या संदर्भात प्रत्येक खातेदाराने लक्ष देणे आवश्यक आहे. State Bank of India said eight SURAKSHA security measures to prevent cyber fraud

• प्रत्येक व्यक्तीने इंग्रजी SURAKSHA , सुरक्षा हा शब्द नेहमी लक्षात ठेवला पाहिजे.
S – म्हणजे ऑनलाइन घोटाळा पासून सावध रहा.
U – म्हणजे स्ट्रॉंग पासवर्डचा वापर करा.
R – म्हणजे अज्ञात लिंकवर कधी ही क्लिक करणे टाळा.
A – म्हणजे अज्ञात लोकांच्या कडून शिफारस केलेले ॲप्स डाऊनलोड करणे टाळा.
K – म्हणजे तुमच्या खात्यातील व्यवहाराचा नियमित मागोवा घ्या.
S – म्हणजे तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवा.
H – म्हणजे ऑनलाइन व्यवहार करताना आपला पिन, CVV, ओटीपी लक्षात ठेवा.
A – म्हणजे नेहमी तुमच्या फोनमध्ये अँटिव्हायरस अपडेट ठेवा. तसेच वैयक्तिक तपशील कधी ही शेअर करू नका. याच बरोबर बँकेने सांगितले आहे की, बँकेशी संबंधित तुमची व्यक्तिगत माहिती कोणालाही शेअर करू नका. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. State Bank of India said eight SURAKSHA security measures to prevent cyber fraud

भारतात सायबर फ्रॉडचे प्रमाणे गेल्या काही दिवसात वाढले आहे. अनेकदा फसवणूक होते व लोकांना याची माहिती देखील मिळत नाही. आपोआप एका मेसेजमुळे बँक खात्यातील लाखो रुपये उडालेले असतात. सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने आधीच सायबर दोस्त नावाने एक प्लॅटफॉर्म तयार केला असून, जो ट्विटरवर सक्रिय आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने फसवणुकीपासून वाचण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन १५५२६० आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्मची सुरूवात केली आहे.मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, सायबर फसवणुकीचे शिकार होणाऱ्या लोकांना तक्रार करण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करत आहोत.

मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात गृह मंत्रालयाने सायबर फसवणुकीपासून होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर १५५२६० आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे. ही हेल्पलाइन १ एप्रिल २०२१ ला मर्यादित स्वरूपात सुरू करण्यात आली होती. हेल्पलाइन १५५२६० आणि याचे रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म हा इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन (आई4सी) द्वारे संचालित आहे. यात आरबीआय, सर्व मोठ्या बँका, पेमेंट बँका, वॉलेट आणि ऑनलाइन व्यवसायांची मदत मिळाली आहे. आय4सीने कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्था, बँका आणि मध्यस्थांना एकत्रित करण्यासाठी नागरिक वित्तीय सायबर फसवणूक माहिती आणि व्यवस्थापन प्रणाली संस्था विकसित केली आहे.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice