‘नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल Hindu Mortuary’ जगात आपली नाचक्की होईल,” – सामनातून निशाना

‘नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल Hindu Mortuary’ जगात आपली नाचक्की होईल,” – सामनातून निशाना

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनातून केंद्र सरकारवर निशाना साधण्यात आला आहे.

“हिंदुत्वाच्या नावावर पश्चिम बंगालमध्ये धार्मिक, सामाजिक विभाजन करता आले नाही. त्यामुळे हे टूलकिट अपयशी ठरले. Corona कोरोनाशी लढाई आणि लोकांसाठी जीवन यज्ञ महत्त्वाचा नसून निवडणुकांनाच प्राधान्य मिळत आहे. निवडणुका मागेपुढे झाल्याने आकाश कोसळणार नाही.

“सध्या संपूर्ण लक्ष कोरोनाच्या लढाईकडे देणं गरजेचं आहे. Ganga River नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी Hindu mortuary होईल. जगात आपली नाचक्की होईल,” असं सामनाच्या अग्रलेखात  म्हटलं आहे.

https://www.saamana.com/saamana-editorial-on-corona-situation-and-uttar-pradesh-election/

“निवडणूक प्रचाराच्या वेळी कोरोनाचा प्रसार झाला. निवडणूक आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला फासावर लटकवू का नये? असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केला होता. उत्तर प्रदेशच्या बाबतीतही केंद्र सरकार तीच चूक करत आहे. गंगेतील पात्रात वाहत असलेल्या मृतदेहांना पुन्हा जिवंत करणार नाही. पश्चिम उत्तर प्रदेशातील मथुरा, मेरठ, बागपत या जाटबहुल प्रदेशात भाजपचा पराभव झाला.”

“अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन कोरोना काळात करून घेतले गेले, त्या भूमीपूजनावर गंगेत तरंगणारे मृतदेह भारी पडत आहेत. गंगेत आज हिंदूंचे मृतदेह बेवारस अवस्थेत तरंगत आहेत. हे मृतदेह भाजपला राजकीय पराभवाकडे ढकलत आहेत,” असं सामनाने म्हटलं आहे.

<

Related posts

Leave a Comment