‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा यशस्वी होण्यामागची कारणं काय? जाणून घ्या | Baipan Bhaari Deva Success Reasons

‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा यशस्वी होण्यामागची कारणं काय? जाणून घ्या | Baipan Bhaari Deva Success Reasons

‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. why Success and hit marathi move Baipan Bhaari Deva Reasons

काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.

‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मग ते सिनेमागृह असो वा महिला मंडळ गॉसिप गँग. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासोबत बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमाने सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या 14 दिवसांत 36.78 कोटींची कमाई केली आहे. तगडी स्टारकास्ट, जोरदार प्रमोशन आणि माउथ पब्लिसिटीच्या जोरावर दिवसेंदिवस या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये (Box Office Collection) वाढ होत आहे.

‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा चालण्याचं मुख्य कारण म्हणजे या सिनेमाची साधी सरळ गोष्ट. मेनोपॉज, घटस्फोट आणि नैराश्य अशा नाजूक विषयांवर हळुवार हात घालण्यात आला आहे. जया, शशी, साधना, चारु, केतकी आणि पल्लवी या सहा बहिणींची गोष्ट म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा होय.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच राज्यभरातली चित्रपटगृहं आणि दमदार कमाईनं बॉक्स ऑफिसवरही ‘भारी’ ठरलं आहे. या चित्रपटाला महिला प्रेक्षक तुडुंब गर्दी करीत असल्याचं चित्र सध्या मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहांत बघायला मिळत आहे. ‘बाईपण…’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत आहे

  • ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा प्रत्येक वयोगटातील महिला रिलेट करत आहे. त्यामुळे महिलावर्गाला हा सिनेमा भावला आहे.
  • सिनेमातील, संवाद कलाकारांचा अभिनय, हटके पेहराव प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.
  • तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा. रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), दीपा परब (Deepa Parab) आणि सुकन्या मोने (Sukanya Mone) अशा मराठी मनोरंजनसृष्टीतील दर्जेदार अभिनेत्री या सिनेमात आहेत. या प्रत्येकीचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.
  • ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा चालण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या सिनेमाचं मार्केटिंग. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने खास पोस्ट शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली होती. तर सुपरस्टार अशोक सराफ यांनी या सिनेमाचा ट्रेलर आऊट केला होता.
  • रिलीजआधीपासूनच या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये वेगवेगळे प्रयोग होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुलाखंतीसोबत सोशल मीडियाचा चांगला वापर या सिनेमाच्या टीमने केला आहे. ‘आ जाओ दिखा दुंगा’ असं म्हणत रिल्स करणाऱ्या प्रॉपर्टी गुरु भावेशच्या ट्रीकचा वापरही करण्यात आला.
  • ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचा टार्गेट ऑडियन्स हा महिलावर्ग आहे. भजनीमंडळ, महिला बचत गट, किटी पार्टी ग्रुप असे महिलांचे वेगवेगळे ग्रुप समुहाने जाऊन सिनेमा पाहण्याचा आनंद घेत आहेत.
  • सिनेमा रिलीज झाल्यानंतरही कलाकारांची सिनेमा सोबतची नाळ जोडली गेली आहे. सिनेमागृहात जाऊन प्रेक्षकांना भेटणं, त्यांचे अनुभव ऐकणं, वेगवेगळ्या मुलाखती देणं, प्रेक्षकांसोबत सिनेमातील गाण्यांवर डान्स करणं अशा अनेक गोष्टी या सिनेमातील अभिनेत्री करत आहेत.
  • सिनेमा पाहाल्या जाताना महिला गॉगल लावून, नऊवारी साडी नेसून जात आहेत. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
  • ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाला टक्कर देणारा कोणताही मराठी-हिंदी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर नाही.
  • ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. जुने शब्द आणि नवं म्युझिक प्रेक्षकांना आवडलं आहे.
<

Related posts

Leave a Comment