वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई,  दि. 30 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरिता वैयक्तिक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू झाल्या असून, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. 18 ते 50 वर्ष वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गरजू व्यक्तींनी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अधिक माहितीकरिता गृहनिर्माण भवन, खो.क्र.३३, कलानगर, बांद्रा (पू), मुंबई. दूरध्वनी क्रमांक ०२२- २५४२८९०७ येथे संपर्क साधावा, असे आवाहन  अरुण माने जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मुंबई शहर व उपनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Mumbai, dt. 30: Vasantrao Naik Vimukta Jati and Bhatakya Jamati Vikas Mahamandal has started individual interest repayment and group loan interest repayment schemes for Vimukta Jati, Bhatakya Jamati and special categories of needy people. Such an appeal has been made by Vasantrao Naik Vimukta Jati and Nomadic Tribes Development Corporation.

To avail the benefits of the schemes of the Corporation, the applicant should be from deprived castes, nomadic tribes and special categories as well as residents of Mumbai and Mumbai suburban districts. The scheme will benefit the needy in the age group of 18 to 50 years. Only one person in a family will be able to avail the benefits of this scheme. The needy persons should apply on the website of the corporation www.vjnt.in along with the required documents. For more information, Housing Building, Kho. No. 33, Kalanagar, Bandra (E), Mumbai. Arun Mane, District Manager, Vasantrao Naik Vimukta Jati and Nomadic Tribes Development Corporation, Mumbai City and Suburbs has appealed to call 022-25428907 through a press release.

<

Related posts

Leave a Comment