महाराष्ट्र

समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण; महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास

नागपूर, दि.११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी महामार्गाची पाहणी केली. तत्पूर्वी श्री. मोदी यांनी समृद्धी महामार्गावर झिरो पॉईंट ते टोल प्लाझा असा 10 किलोमीटरचा प्रवास केला. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मान्यवर होते.

प्रधानमंत्र्यांनी घेतला ढोलताशाचा आनंद
कोनशिला अनावरणप्रसंगी प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी ढोलताशा पथक ठेवण्यात आले होते. प्रधानमंत्र्यांनी स्वतः ढोल वाद्य वाजवत अनोखा आनंद घेतला. तसेच या पथकातील कलावंतांशी संवाद साधला. कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अनावरण संपवून निघताना प्रधानमंत्र्यांनी नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी वाहन हळू करत नागरिकांना हात दाखवित त्यांचे अभिवादन स्वीकारले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 6
  • Today's page views: : 6
  • Total visitors : 512,777
  • Total page views: 539,684
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice