जालना शहरात खो खो चा थरार जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन

जालना शहरात खो खो चा थरार जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन

जालना/प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या वतीने जालना जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 व 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, रेल्वे स्टेशन रोड, जालना याठिकाणी करण्यात आले आहे. Under 14 State Level School Kho kho comptition at Jalna


सदर स्पर्धा 14 वर्ष आतील मुले व मुली यांच्या गटात होणार असून महाराष्ट्र राज्यातून आठही क्रीडा विभागाचे मुला मुलींचे संघ जवळपास 300 खेळाडू व प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच सहभागी होणार आहेत. याच स्पर्धेतून राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडू यांना टीशर्ट व कॅप तसेच प्रथम येणाऱ्या तीन संघांना स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन उद्या गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी मार्च पास व इतर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. Under 14 State Level School Kho kho comptition at Jalna

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा . जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मा . उपसंचालक , क्रीडा व युवक सेवा , छत्रपती संभाजी नगर श्री संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा कार्यालयाचे खो खो मार्गदर्शक तथा तालुका क्रीडा अधिकारी श्री संतोष वाबळे , क्रीडा मार्गदर्शक श्री शेख मोहम्मद, क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा परदेसी, जिल्हा खो खो संघटनेचे सचिव डॉ. शेख रफिक तसेच सदर स्पर्धेकरिता स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांचे पदाधिकारी, जिल्हा संघटक आणि जिल्हा परिषद निवासी प्रबोधिनीचे व्यवस्थापक श्री प्रमोद खरात आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. Under 14 State Level School Kho kho comptition at Jalna

<

Related posts

Leave a Comment