मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत नाहीतर…; शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ॲलर्जी

मशिदींवरचे भोंगे उतरलेच पाहिजेत नाहीतर…; शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ॲलर्जी

The loudspeaker on the mosques must come down otherwise…; Sharad Pawar is allergic to Hindu words

मशिदींवरील भोंग्यावरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंग्याचा विषय मनसे अध्यक्ष राज यांनी उचलून धरला होता. त्यावरुन, गेल्या 10 दिवसांपासून राज ठाकरेंवर टिका करणाऱ्यांना काय प्रत्युत्तर मिळणार? राज ठाकरे काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. ‘लाऊडस्पीकर हा काही नवीन विषय नाही. याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे आणि मी फक्त त्याला पर्याय दिला आहे. लाऊडस्पीकर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल तर मशिदीबाहेर आम्ही हनुमान चालिसा लावू, असे राज यांनीम्हंटले आहे. नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दिनी म्हणजे आजच औरंगाबादमध्ये सभा पार पडली.राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून मनसैनिकांनी औरंगाबादमध्ये मोठी गर्दी केली होती. राज यांच्या सभेकडे राजकीय वर्तुळाचे तसेच राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. (The loudspeaker on the mosques must come down otherwise…; Sharad Pawar is allergic to Hindu words)

तर दुसरीकडे राज यांचं भाषण सुरू असताना मशिदीतून अजानचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर राज ठाकरे हे आणखीनच भडकले. ‘माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. हे जर सभेवेळी बांग सुरु करणार असतील, तर यांच्या तोंडात बोळा कोंबा. यांना सरळ शब्दांत सांगून कळत नसेल, तर राज्यात काय होईल ते मला माहीत नाही,’ असं राज म्हणाले. दरम्यान, पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले,  ‘उत्तर प्रदेशमध्ये लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, स्थानिक पोलीस ठाण्यात विचारल्याशिवाय लाऊडस्पीकर लावू शकत नाही. किती मशिदींकडे परवानगी आहे ? ’‘संभाजीनगरमध्ये ६०० मशिदी असल्याचे मला काल सांगितले. असे फक्त संभाजीनगरमध्ये नाही तर देशभरात आहे. संपूर्ण देशातले लाऊडस्पीकर खाली आले पाहिजेत. प्रत्येक वेळा आम्हीच का भोगायचे, असे सवाल राज यांनी उपस्थित केले. तसेच संपूर्ण देशातील लाउडस्पीकर खाली आले पाहिजेत, असे राज ठाकरे म्हणाले. (The loudspeaker on the mosques must come down otherwise…; Sharad Pawar is allergic to Hindu words)

आज पुन्हा एकदा राज यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी शब्दात टीका केली. पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत शरद पवार हे नास्तिक असल्याचं म्हटलं होतं, असा दावाच राज ठाकरे यांनी आज सभेत बोलताना केला आहे. राज ठाकरे म्हणाले, ‘पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग फोटो यायला लागले. सुप्रिया सुळे संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक आहेत. जिकडे सभा घेतात तिकडे सांगतात राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजे.’ (The loudspeaker on the mosques must come down otherwise…; Sharad Pawar is allergic to Hindu words)

तसेच ‘पवारांनी जे हवं ते न वाचता सगळी पुस्तकं वाचली. मी सर्व वाचलंय. ते सर्व वाचलं तर ते परिस्थितीला धरून आहे, व्यक्तिसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारं नाही. हिंदू धर्माची पूजा करणारा माणूस होता तो. धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणारा व्यक्ती होता. माझे आजोबा भटभिक्षुकांच्या विरोधात होता, असे राज ठाकरे म्हणाले. थेट पुरावेच राज ठाकरेंनी सादर केले. ‘पवारांना हिंदू या शब्दाची मुळात अ‍ॅलर्जी आहे. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहेच पण त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले आहेत. पण पवारांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही, असे राज यांनी म्हंटले. दरम्यान, शरद पवारांची भाषणे काढून पाहा, महाराजांचा त्यांनी कधी उल्लेख केला का?, मी बोलल्यानंतर आता त्यांनी सुरुवात केली, असे ठाकरे म्हणाले. याचबरोबर महाराष्ट्रात जातीपातीचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे सुरू झाला असल्याचा गंभीर आरोप राज यांनी केला. (The loudspeaker on the mosques must come down otherwise…; Sharad Pawar is allergic to Hindu words)

हे ही वाचा =====

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice