सध्या कोविड-19 च्या आजारातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकर मायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, मात्र वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी असल्याचे मत कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजय मंठाळे यांनी व्यक्त केले. कोरोना संसर्गाबरोबरच म्युकर मायकोसिस आजाराने रुग्णांच्या चिंतेत आणखीच भर टाकली आहे. प्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. हे एक फंगल इन्फेक्शन असून ते साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना हा आजार दोन ते सहा आठवड्यापर्यंत होऊ शकतो.…
Read More