सदावर्तेंचे पाय खोलात; एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये लाटले, कर्मचाऱ्यानेच समोर आणले सत्य

सदावर्तेंचे पाय खोलात; एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये लाटले, कर्मचाऱ्यानेच समोर आणले सत्य

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या चप्पलफेक आणि दगडफेकीमुळे खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी ११० आंदोलकांसह एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. st-strike-gunaratna-sadavarten-took-money-from-us-audio-clip-of-the-st-employee

कट रचणे, जमावाला भडकवणे, चिथावणीखोर भाषणे करणे, या गुन्ह्या अंतर्गत सदावर्तेंवा अटक करण्यात आली आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुणरत्न सदावर्तेंनी पैसे घेतल्याचा एका एसटी कर्मचाऱ्याने दावा आहे. तशी एक ऑडीओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. st-strike-gunaratna-sadavarten-took-money-from-us-audio-clip-of-the-st-employee

विलीनीकरण मिळवून देतो असे आश्वासन देत वकील जयश्री पाटील मॅडम स्वत: आमच्याकडे येऊन पैसे मागत होत्या, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे डिसेंबर महिन्यापासून पुण्यातील एसटी कर्मचारी पैसे देत असल्याचे खुद्द कर्मचाऱ्याने सांगितले आहे. st-strike-gunaratna-sadavarten-took-money-from-us-audio-clip-of-the-st-employee

पैसे घेतल्याचा खुलासा करणारी एक ऑडीओ क्लीप समोर आली आहे. एका मराठी वृत्तवाहिणीच्या प्रतिनिधीशी बोलताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आंदोलनात जे एसटी कर्मचारी सामील होते त्यांनी पैसे दिलेले असल्याचे ऑडीओ क्लीपमधील कर्मचारी सांगत आहे. st-strike-gunaratna-sadavarten-took-money-from-us-audio-clip-of-the-st-employee

तसेच पैशांची मागणी ही कॅशच्या स्वरुपात करण्यात येत होती. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर एसटी स्टँड, स्वारगेट एस टी स्टँड मधील कर्मचाऱ्यांनीही पैसे दिल्याचा सांगितले आहे. याचबरोबर राज्यातील तब्बल 70 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी पैसे दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट या व्हिडिओ क्लिपमधून झाला आहे.

दरम्यान, पुढे ऑडीओ क्लीपमधील कर्मचारी सांगत आहे की, आंदोलनात जे एसटी कर्मचारी सामील होते त्यांनी पहिल्या महिन्यात 540 रुपये त्याचबरोबर अधिक 300 रुपये प्रत्येक पैसे दिले. दरम्यान, एसटीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हा खुलासा केला आहे.

<

Related posts

Leave a Comment