अठ्ठावीस वर्षांनी अनुभवला शालेय दिवस; दहावी पर्यंत एकत्र शिकलेल्या बाल वर्ग मित्रांचे स्नेह संमेलन

अठ्ठावीस वर्षांनी अनुभवला शालेय दिवस; दहावी पर्यंत एकत्र शिकलेल्या बाल वर्ग मित्रांचे स्नेह संमेलन

नगर || दहावीनंतर शिक्षण आणि त्यानंतर व्यवसाय, नोकरी व अन्य कारणाने दुरावलेले मित्र २८ वर्षांनंतर एकत्र आले. ४० ओलांडलेले हे मित्र-मैत्रिणी वेगवेगळ्या भागात व्यवसाय, नोकरीत स्थिरावले. मात्र आता आयुष्याच्या या वळणावर आलेल्या मित्र-मैत्रिणींनी सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला आहे. Sneha Samelan of childhood classmates who studied together till class 10th

बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील जिल्हा परिषदेत दहावीपर्यंत एकत्र शिकलेले मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन अहमदनगर येथे (स्नेहमिलन) गेट-टूगेदर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पुणे, बीड, परभणी, औरंगाबाद, मुंबई, नाशिक अशा वेगवेगळ्या भागात स्थायिक झालेले मित्र-मैत्रिणी सहभागी झाले होते. त्यात प्रसिद्ध व्यावसायिक अभिजित डुंगरवाल, आदिनाथ सूर्यवंशी, संदीप कानडे, अतिश गाडेकर, आनंद बाफना, नारायण गाडेकर, संतोश गटागट,  विनोद व्यवहारे, आदिनाथ नागरगोजे, डाॅ. अशोक मिसाळ, डाॅ. सचिन चव्हाण, डाॅ. विठ्ठल ढाकणे, डाॅ. अर्चना पालवे, मुख्याध्यापक सीमा बडे, स्वाती कानडे, भाऊसाहेब नेटके, बद्रीनाथ पवार, नवनाथ पानखडे, लिंबाजी पवार, हनुमंत खेडकर, विजय केदार, अशोक शेकडे, कल्याण ढाकणे, मिना येवले, ज्योती अंदुरे, सुलभा तुपे, सुनीता जायभाये, सारिका डुंगरवाल, माधुरी देसारडा, वैशाली लोढा, अरूणा केदार, पत्रकार सूर्यकांत नेटके आदीसह सहभागी झाले होते. 

व्यवसाय, नोकरीत स्थिरावलेल्या मित्रांनी यावेळी वेगवेगळ्या विषयावर चर्चा चर्चा केली. २८ वर्षांच्या कालावधीत मयत झालेल्या मित्र, गुरुवर्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मध्यंतरीच्या तीन वर्षाच्या काळात कोरोना सारख्या गंभीर संकटाशी सामोरे जाऊन आपन एकत्र आल्याचा प्रत्येकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. २८ वर्षांतील प्रगती आणि वेगवेगळे अनुभव यावेळी प्रत्येकांनी सांगितले. अनेक वर्षांनंतर भेटल्याने जुन्या आठवणीत हरखून गेलेले अभिजित डुंगरवाल, आदिनाथ सूर्यवंशी, डाॅ. सचिन चव्हाण, डाॅ. अर्चना पालवे, सारिका डुंगरवाल, स्वाती कानडे आदींसह इतरांनी त्यावेळी शाळेतील गमतीजमती सांगितल्या. आतापर्यत आनंदी आणि सुखी जीवन जगताना आता आय़ुष्याच्या या वळणार आसताना पुढील काळात सेवा, प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याचा सर्व मित्रांनी निर्णय घेतला. पत्रकार सूर्यकांत नेटके यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित डुंगरवाल यांनी आभार मानले.

<

Related posts

Leave a Comment