Sexual abuse of a married woman by a priest in Nanded
विवाहितेचा आंघोळ करतानाचा चोरून फोटो काढून तो समाजात पसरविण्याची धमकी देऊन एका चाळीस वर्षे विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या पुजार्याने ‘ तुझ्यासाठी मला देवानेच पाठवले आहे , असे सांगून पीडित विवाहित महिलेच्या तरुण मुलीवर देखील अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेड येथे उघडकीस आली असून याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या पुजाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, गोपाळ चावडी परिसरातील पुजारी असलेला आरोपी हा मार्च 2015 मध्ये पीडित महिलेच्या घरी गेला होता त्यावेळी पीडित महिला अंघोळ करत असताना तिचे फोटो काढून त्याने ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडित महिलेने विरोध केला असता ‘ मी महाराज आहे मला तुझ्यासाठी देवाने पाठवले आहे, मी जे म्हणेल ते तो ऐकले पाहिजे आणि त्याप्रमाणे वागले पाहिजे’, असे सांगत त्याने जीवे मारण्याची धमकी देखील महिलेला दिली आणि आणि तिच्यावर अत्याचार केले.
सातत्याने असला प्रकार सुरू झाल्याने काही कालावधीत पीडित महिला ही गर्भवती राहिली. त्यानंतर तीन वर्षापूर्वी यानी पीडित महिलेच्या पोटात लाथ मारून तिचा गर्भपात केला तसेच वीस वर्षीय मुलीवर देखील आरोपीने अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीच्या मोबाईलवर आरोपीने अश्लिल छायाचित्रे पाठवली असेदेखील पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याआधी देखील पीडित महिलेने जून महिन्यात पुजार्याने आत्याचार केल्याबाबत ठाण्यात लेखी अर्ज दिला होता मात्र त्यावेळी तिचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता मात्र आता आरोपी याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला असून पोलीस तपास सुरु असल्याचे समजते.
===========================================
- कोण आहे IAS पूजा खेडकर? व्हीआयपी मागण्या करणाऱ्या आयएएस प्रशिक्षणार्थीं चर्चेत
- Who Is Manu Bhaker।कोन आहे मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचणारी भारताची स्टार नेमबाज
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णय
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 3.0 72 मंत्र्यांसह, मंत्रिमंडळात 9 नवीन चेहरे | Modi 3.0 With 72 Ministers Takes Oath, 9 New Faces In Cabinet