राज राणे राणा राणी राजकारण राडा राडा; विरोधकांचा महाराष्ट्र अस्थिर करण्याचा डाव

राज राणे राणा राणी राजकारण राडा राडा;  विरोधकांचा महाराष्ट्र अस्थिर करण्याचा डाव

Opposition’s conspiracy to destabiliConspiracy by the Opposition party to destabilize the State of Maharashtra

महाराष्ट्रात मागील काही दिवसाच्या घडामोडी पाहता विरोधकाकडून सरकार पक्षांना नमोहरम करण्यासाठी विविध प्रकार वापरल्याचे आरोप ठाकरे सरकार साम्र्थाकाकडून केला जात आहे. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत सत्ताधारी आमदार,मंत्री नातेवाईक, समर्थक दबाव टाकल्या जात असल्याचाही आरोप महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही आरोप करत विरोधकांचा महाराष्ट्र अस्थिर करण्याचा डाव असल्याचे बोलले आहे.

हे सर्व चालू असतानाच राज्यातील विविध लोक हाताशी धरून सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करायचे. विरोधकाकडून मनसे प्रमुख राज ठाकरे, नारायण राणे, अमरावतीचे राणा दांपत्य, एसटी संपक्याचे वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्या सरकार विरोधी वक्तव्य कारवायाना खतपाणी घात्ल्याचाही आरोप सत्तधारी मविआ घटक पक्षाकडून केला जात आहे.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरावा नाहीतर मशिदी समोर भोंगे लाऊन हनुमान चालीसा वाजवणार ही घोषणा केल्यापासून या महाराष्ट्रदेशी एकच कलकलाट सुरू झाला आहे! या ‘आवाज की दुनिया’मध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आपलाही आवाज लावला आणि हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सारेच नेते तसेच त्यांचे समर्थक झांजा वाजवण्यात दंग होऊन गेले. त्यामुळे एकेकाळी सर्वांना बरोबर घेऊन गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या राज्यात सांप्रत काळी नेमके काय सुरू झाले आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत मांडलेल्या भूमिकेचे समर्थन करीत, ‘राज्य सरकारने बेकायदा भोंगे उतरावेत, असा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारला दिला. राणे यांच्या बंगल्यातील बेकायदा बांधकामावरून मुंबई महापालिकेने नोटिस बजावली असून, त्यानुसार कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या भोंगे व हानुमान चालीसा प्रकरणात अमरावतीचे राणा खासदार आमदार द्म्पत्य यांनी उढी घेत थेट मुख्यमंत्री यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठन करण्याची हानुमान उडी घोषणा केली आणी

राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं सांगितलं. यानंतर राज्यात राजकारण पेटलं आहे. मुंबईत मातोश्रीसमोर शिवसैनिकांनी दोन दिवसांपासून ठिय्या दिला आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीचीही शिवसैनिकांनी तोडफोड केली. यानंतर दिवसभराच्या राजकीय नाट्याचा अंत राणा दाम्पत्याच्या अटकेने झाला.

मात्र, त्यात किरीट सोमय्यांची भर पडली. खार पोलीस स्टेशनला राणांना भेटण्यासाठी गेलेल्या सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि सोमय्या जखमी झाले. (Kirit Somaiya attacked in khar of mumbai)अखेर सोमय्यांची तक्रार नोंदवण्यात आली. मात्र, ही बोगस असल्याचं त्यांनी म्हटलं. सोमय्यांच्या तक्रारीनंतर तत्काळ शिवसैनिकांनीही प्रति तक्रार दाखल करून सोमय्यांनी अंगावर गाडी घातल्याचा आरोप केला. (Shivsena Vs Navneet Rana)

महत्वाच्या बातम्या

<

Related posts

Leave a Comment