अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात नवं वळण; मॉरिसने गोळ्या झाडल्या की दुसऱ्या कुणी घटना संशयास्पद

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात नवं वळण; मॉरिसने गोळ्या झाडल्या की दुसऱ्या कुणी घटना संशयास्पद

Abhishek Ghosalkar | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. दहिसर येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर यांची गुरूवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांची हत्या स्वयंघोषित नेता आणि स्थानिक गुंड अशी ओळख असलेल्या मॉरिस नरोनाने केली. हत्येनंतर आरोपीने देखील स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. New twist in Abhishek Ghosalkar murder case; If Morris shot someone else, the incident is suspicious

अभिषेक घोसाळकर यांना गोळीबारानंतर जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली. या हत्येच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

राज्यातील राजकारण तापलं ते म्हणाले की, फेसबुक लाईव्हवर एका लोकप्रतिनिधीवर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते? शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी घटना आहे. एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे.

Abhishek Ghosalkar यांची हत्या

तसेच अशा प्रकारच्या बातम्या यापूर्वी फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. राज्यात काय सुरू आहे याची जाणीव तरी सत्ताधाऱ्यांना आहे का?, अशा शब्दांत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

<

Related posts

Leave a Comment