निखिल वागळेची ही चुक भवली … त्यांच्यावर पुणे येथे “निर्भय बनो” कार्यक्रमाला येताना प्राणघातक हल्ला

निखिल वागळेची ही चुक भवली … त्यांच्यावर  पुणे येथे “निर्भय बनो” कार्यक्रमाला येताना प्राणघातक हल्ला

पुण्यात आज (9 फेब्रुवारी) राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी निखिल वागळे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण हा कार्यक्रम उधळून लावू अशी धमकी पुण्यातील काही भाजप नेत्यांनी दिली होती. Journalist Nikhil Wagle assaulted at Nirbhay Bana program in Pune

दरम्यान, पुण्यात आज दुपारपासून निखिल वागळेंवर भाजपने जोरदार आंदोलन सुरू होतं. मात्र, संध्याकाळी कार्यक्रमस्थळी निखिल वागळे यांची कार येताच भाजप कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी वागळेंच्या कारवर जोरदार हल्ला केला. एवढंच नव्हे तर शाईफेक देखील करण्यात आली. Journolist Nikhil wagle Attack in pune पुण्यात शास्त्री रोडवर महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाले. त्यामुळे जेव्हा वागळेंची गाडी ही दांडेकर पूल चौकामध्ये आली तेव्हा अचानक निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

निखिल वागळे यांनी 4 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान मोदी यांच्याबाबत एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्याच प्रकरणी भाजप नेते सुनील देवधर यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात वागळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.

विरोधकांची सभा उधळून टाकू असे जाहीर सांगणे म्हणजे “लोक हो, त्या सभेला प्रचंड गर्दी करून उपस्थित राहा.. जोरदार प्रतिकार करा..”असे सांगणे!
“आमचे दंडुकाधारी हात वरच्या वर पकडा..” असेही सांगणे!!
आणि “उधळ फुदळ गुंडांचा म्हणजे आमचा डाव पार उधळून टाका” असेही सांगणे होय.. निखिल वागळे यांच्या गाडीवर भ्याड हल्ला करणाऱ्या गुंडांचा निषेध !!!
या हल्ल्यातून वागळे यांच्या सह सगळे बचावले. त्यांना यातून अधिक बळ मिळाले.. त्यांची सभा प्रचंड गर्दीत पार पडली

<

Related posts

Leave a Comment