Maratha Reservation मराठा आरक्षणविरोधी लढ्याला भाजपची रसद; आरक्षणाला पाठिंबा हा त्यांचा दिखावा, काँग्रेसचा BJP वर निशाणा.

Maratha Reservation मराठा आरक्षणविरोधी लढ्याला भाजपची रसद; आरक्षणाला पाठिंबा हा त्यांचा दिखावा, काँग्रेसचा BJP वर निशाणा.

 मराठा आरक्षणाचा Maratha Reservation मुद्दा सध्या राज्यात तापलेल्या शिसासारखा धगधगत असून, विरोधकांनी यावरून महाविकास आघाडीवर जोरदार हल्लबोल चढवला आहे. तसेच, भाजपने BJP मराठा समाजाच्या आंदोलनाला आणि मोर्चांना पाठिंबा जाहीर केला असून, यावरून काँग्रेसचे Congress नेते आणि मंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी भाजपवर टीका केली आहे.

“मराठा आरक्षणाला Maratha Reservation घेऊन भाजपाने घेतलेली भूमिका ही फक्त दिखावा म्हणू घेतली असून, त्यांना आरक्षणाच्या मुद्द्याचं केवळ राजकारण करायचं आहे,” या शब्दांत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून ट्विट केले असून, काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते Sachin Sawant सचिन सावंत यांनी भाजपची ही दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आणल्याचं देखील त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

सचिन सावंतांबद्दल ट्विटमध्ये बोलताना त्यांनी, “सचिन सावंत यांनी भाजपाची मराठा आरक्षणासंदर्भातली दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा जाहीररित्या चव्हाट्यावर आणली आहे. आज त्यांनी मांडलेले मुद्दे हे अतिशय गंभीर आहेत. भाजपचा मराठा आरक्षणाबाबत कळवळा हा केवळ दिखाऊ असून, त्यांना केवळ मराठा आरक्षणचं राजकारणच करायचं आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे,” असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सचिन सावंत यांनी ट्विट करून, “एके ठिकाणी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असा देखावा करायचा व दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना न्यायालयात विरोध करायला सांगायचे‌? भाजपानेच मराठा आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवली का? अनुप मरार कोण आहे? संघ कनेक्शन काय? याचे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील व फडणवीस यांनी द्यावे,” असा निशाणा भाजपवर साधला आहे.

<

Related posts

Leave a Comment