भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department, IMD) राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर, राज्यातील इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरुये. heavy rains in the state; ‘Red alert’ to Konkan-West Maharashtra Warning of moderate rains in Marathwada
मुंबई (Mumbai), ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि विदर्भातही पावसानं थैमान घातलंय. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळं (Heavy Rainfall) पूरस्थितीत निर्माण झालीय. तर, अनेक ठिकाणी वीज पडून लोकांना आपला जीवही गमवावा लागलाय. आतापर्यंत राज्यात एकूण ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्यात १५ एनडीआरएफच्या (NDRF) टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
त्यामुळं राज्यात पुढचे तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (Indian Meteorological Department) वर्तवलाय.
राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालंय. Chance of heavy rains in the state; ‘Red alert’ to Konkan-West Maharashtra Warning of moderate rains in Marathwada
राज्यात पावसाची दमदार हजेरी
देशातील अनेक राज्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलीय. जम्मू आणि काश्मीरपासून मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ढगफुटी, भूस्खलन, अतिवृष्टी आणि महापुरानं दिवसभरात विविध राज्यांमध्ये सुमारे 20 जणांचा मृत्यू झालाय. Chance of heavy rains in the state; ‘Red alert’ to Konkan-West Maharashtra Warning of moderate rains in Marathwada
- 9 जुलै : रेड अलर्ट
- 10 जुलै : ऑरेंज अलर्ट – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर
- 8-11 जुलै : सोसाट्याचा वारा – कोकण आणि गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहेल.
हे ही वाचा ——-
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत
- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण
- बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरू
- NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
