मराठा आरक्षणासाठी जात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा अवमान करणाऱ्या चितळे, जोग यांच्यावर गुन्हा दाखल करा

मराठा आरक्षणासाठी जात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा अवमान करणाऱ्या चितळे, जोग यांच्यावर गुन्हा दाखल करा

सध्या खुल्या प्रवर्गातील जातींचे सर्वेक्षण चालू आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी शासनाने नेमून दिलेले आपापले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे घरोघर जावून प्रत्येक जातींचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्तराबद्दल माहिती गोळा केली जात आहे. परंतु हे करत असताना जातीने कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण असणाऱ्या कुण्या चितळे नावाच्या टुकार नटीचा सर्वेक्षण करणाऱ्या ‘ कर्मचारी महिलेचा ‘ अवमान करणारा आणि तिची खिल्ली उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. त्यात ऐन गणतंत्र दिवसाच्या मुहूर्तावर जात पडताळणी केली जात आहे असे म्हणत त्या बयेने महिला कर्मचाऱ्याचा उपहास केला. बरं गणतंत्र दिवसाच्या दिवशी जातीय सर्वेक्षण करणे याचा उपहास करत असताना ती नटी मात्र आपण ‘ कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण ‘ असल्याबद्दल अभिमानाने, थोड्याशा अहंकारात सांगताना दिसत आहे… म्हणजे कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्याचा अवमान करायचा आणि तोंड वर करून आपली जातही अभिमानाने मिरवायची हा दुटप्पीपणा आहे…. File a case against Chitale, Jog who insulted the employees who came for caste survey for Maratha reservation

केतकी बाईचा व्हिडिओ व्हायरल होतो न होतो तोच कुण्या पुष्कर जोग नावाच्या कुणालाही माहीत नसणाऱ्या टुकार कलाकाराची एक पोस्ट व्हायरल झाली. आधी पोस्ट वाचा “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार’

जोग नावाच्या अहंकारी माणसाने लिहिलेली पोस्ट वाचल्या नंतरच कुणाच्याही लक्षात येते की सदर व्यक्ती चितळे बाई एवढीच अहंकारी आणि उद्धट आहे ते. महिला कर्मचारी नसती तर मी लाथ घातली असती ही भाषा तोंडात येणे हाच पराकोटीचा जातीयवाद आहे. कारण आपण विशेष जातीत जन्माला आल्यामुळे आपण फार कुणीतरी महान आहोत…. तेव्हा एखाद्या इतर जातीय तुच्छ कर्मचाऱ्याने आपल्याला जात विचारावी…. म्हणजे जणू ब्रह्महत्येचे पातक झाल्या एवढा गहजब करणे हा एक प्रकारचा जातीयवाद आहे. जातीच्या अहंकारातूनच इतरांना लाथेने मारण्याची इच्छा निर्माण होते. त्यांना चिरडण्याचा इच्छा निर्माण होते. वरून त्या जोगची धमकी काय? तर कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार’

आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्याला लाथेने मारण्याची मुजोर वृत्ती कुठून जन्माला येते? अरे गाढवा तू जात मानत नाहीस ना? मग तो कर्मचारी तूझ्या दरात आल्या नंतरच त्याला सांगायचे ना? की मी जात मानत नाही, मला कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही. आल्या पावली ते कर्मचारी निघून गेले असते. त्यांना आत बोलावून, जात विचारल्या नंतर त्यांना लाथ मारण्याची इच्छा झाली म्हणणे हा किती उच्च दर्जाचा मजोरडपणा आहे. आपल्या सारख्याच एका जिवंत मनुष्याला तुम्हाला लाथेने मारावे वाटते एवढी असंवेदनशीलता कुठून येते? हा जातीचा माज नव्हे तर दुसरे काय आहे? जातीव्यवस्था हा या देशाचा आणि धर्माचा अविभाज्य भाग आहे. या जाती सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निर्माण केलेल्या आहेत काय? जातीचा आधार घेवून त्यांनी कुणाचा छळ केला आहे काय? कुणाला हीन लेखले आहे काय? कुणाचे हक्क अधिकार हिरावून घेतलेले आहेत काय? उलट इतिहास वाचला असता चितळे बाई आणि जोग यांच्याच जात भाईंनी जातीचे लाभ उपटल्याचे आणि इतरांना छळल्याचे दिसून येते. (जे असे नाहीत त्यांना कोपरापासून दंडवत).

तेव्हा चितळे बाई आणि हा कोण जोग आहे तो या दोघांवर सुद्धा जातीयवाद केल्याचा तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा तत्काळ नोंद करण्यात यावा. आणि सोशल मिदियात जाहीरपणे शासकीय कर्मचाऱ्यांना मारण्याची भाषा केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

जाता जाता : तुम्ही घरात देवाची पूजा करत असताना तुमच्या दारात एखादा अतिथी आलेला असताना त्याची दखल न घेता त्याला दारात ताटकळत ठेवत देवाची पूजा करत बसणे हा अधर्म असल्याचे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे. अतीतासी गाळी | देवा नैवेद्याची पोळी हा अधर्म आहे. आणि माणूस आणि देव असा भेद करणाऱ्या लोकांना तुका म्हणे देवा | ताडण भेदकांची सेवा || अशा शब्दात ठणकावले आहे. File a case against Chitale, Jog who insulted the employees who came for caste survey for Maratha reservation

डॉ बालाजी जाधव

शिवव्याख्याते, संभाजीनगर

<

Related posts

Leave a Comment