Farmer Crop Insurance Scheme | शेतकरी पिक विमा योजनेकडे यंदा शेतकर्‍यांनीच पाठ फिरविली.

Farmer Crop Insurance Scheme | शेतकरी पिक विमा योजनेकडे यंदा शेतकर्‍यांनीच पाठ फिरविली.

पिक विमा भरण्याची मुदत आज संपत आहे.ही मुदत वाढवून देण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू आहेत.पण मुदत वाढल्याने विमा भरण्यासाठी गर्दी वाढेल असं अजिबात नाही. Farmers are not intrst on crop insurance scheme कारण विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे.त्यांना फसवलं आहे.गेल्या वर्षी शेतकर्‍यांच मोठं नुकसान झालं.. तरीही विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना दमडी देखील दिली नाही.. सोयाबीनच्या नुकसानीचे ऑनलाईन फोटो दोन दिवसात पाठवा असे फर्मान विमा कंपन्यांनी काढले.. फोटो पाठविणार्‍या शेतकर्‍यांची संख्या हातच्या बोटावर मोजण्या एवढी देखील नाही.. त्यांना नुकसान मिळाले.. ज्यांनी पाठविले नाहीत ते वंचित राहिले.. केवळ तांत्रिक मुद्दे उपस्थित करून शेतकर्‍यांना लुटण्याचा हा डाव होता.एकाच सर्व्हे नंबर मधील एका शेतकर्‍यांच नुकसान झालं आणि दुसर्‍याच नाही असं होत नाही.. पण तसं झालं.. बीड पॅटर्न म्हणून ज्याचा नाहक गवगवा केला गेला त्या बीडची ही कथा आहे..

खरं तर या लुटमारीवर लोकप़तिनिधीं व शेतकरी संघटनांनी अंकुश ठेवायला हवा होता.. आवाज उठवायला हवा होता.. दुर्दैवाने हा वर्ग गप्प आहे.. कारण असं सांगितलं जातं की, यातील बहुसंख्य विमा कंपन्यांचे लाभार्थी आहेत..त्यामुळे विमा सोडून बोला असं म्हणण्यासारखी स्थिती आहे.. महाराष्ट्रात गेली आठ दिवस ब्रा वर जेवढी चर्चा सुरू आहे तेवढी चर्चा विम्यावर झाली असती तर हजारो शेतकर्‍यांचे कोटकल्याण झाले असते.. Farmers are not intrst on crop insurance scheme

दिवसा ढवळया अशी लूट सुरू असेल तर शेतकरयांनी का विमा भरावा? खरं तर शेतकरी पीक विमा योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी झाली असती तर शेतकर्‍यांच्या मागची साडेसाती काही प़माणात तरी कमी झाली असती.. मात्र ती कमी व्हावी अस राजसत्तेला आणि हितसंबंधीयांना वाटतच नसल्याने एवढी लूट सुरू असताना एकही मायचापूत या विषयावर बोलत नाही.. या मौनामागचं गूढ आपण समजून घेतलं पाहिजे. Farmers are not intrst on crop insurance scheme

हे ही वाचा —————————–

<

Related posts

Leave a Comment