महाराष्ट्रात शिंदेशाही , बहुमत चाचणी जिंकली!

महाराष्ट्रात शिंदेशाही , बहुमत चाचणी जिंकली!

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला. (cm eknath shinde bjp devendra fadanvis wins floor test maharashtra

राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. (Floor Test in Maharashtra)

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सुरुवातीला आवाजी मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली.

यावेळी भाजपा-शिंदे सरकारने १६४ मतांसहित बहुमताचा आकडा पार केला आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ ९९ मतं पडली. विरोधी पक्षाला काल पेक्षा आज ९ मत कमी पडली. (Eknath shinde-Devendra Fadnavis Floor test)

हुमत चाचणीपूर्वी उद्धव ठाकरे यांना दोन धक्के बसले. कट्टर शिवसैनिक संतोष बांगर सह शाम सुंदर शिंदे हे दोघे शिंदे गटात सामील झाले आहेत. काल संतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केले होते. आज बांगर यांनी शिंदे यांच्या बाजूने मतदान केले.

हे ही वाचा

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice