Covid Vaccination | कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी- Bharat Biotech | Covaxin is 77.8% effective
Online Team : कोव्हॅक्सिन (Covaxin) लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. भारत बायोटेकने तिस-या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे हा दावा केला आहे. हा डेटा अद्याप पडताळण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिन (Covaxin) लस घेतली असता वेगाने पसरणा-या डेल्टा व्हेरियंटविरोधात ६५.२ टक्के सुरक्षा मिळते असा भारत बायोटेकचा दावा आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांविरोधात ९३.४ टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
भारत बायोटेकने आयसीएमआर आणि एनआयव्ही पुणेसोबत भागीदारी करत कोरोनाविरोधातील कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीची निर्मिती केली आहे. भारत बायोटेकने कोरोनाची लक्षणे असणा-या १३० जणांची चाचणी केली आहे. गेल्या दोन आठवड्यात देशभरातील एकूण २५ ठिकाणी ही चाचणी पार पडली. चाचणीमध्ये सहभागी झालेल्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. लसीचा परवाना मिळालेल्या कोणत्याही कंपनीने संसर्गाविरोधात इतकी कार्यक्षमता दाखवलेली नसून यामुळे कोरोना संसर्गाचा दर कमी होण्यास मदत मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. भारत बायोटेकच्या सह-संस्थापक सुचित्रा इल्ला यांनी ट्वीट करत भारताला वैज्ञानिक दृढनिश्चय, क्षमता आणि वचनबद्धतेसह जागतिक नकाशावर ठेवल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हटले आहे.
२५ शहरांमधील १३० जणांवर चाचणी
भारत बायोटेकने लक्षणे असणा-या २५ शहरांमधील १८ ते १८ वयोगटातील एकूण १३० जणांवर वैद्यकीय चाचणी केली. यावेळी १२ टक्के लोकांना थोडा त्रास जाणवला तर ०.५ टक्क्यांपेक्षा कमी लोकांना गंभीर त्रास जाणवला अशी माहिती कंपनीने दिली आहे. यावेळी त्यांनी इतर लसींच्या तुलनेत प्रतिकूल परिणामाचा दर कमी असल्याचे म्हटले आहे.
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरलNew Twist in Khavdya Dongar Tragedy: Kunal Chandgude’s Mother Was a YouTuber; Family
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंतHeartbreaking Tragedy at Khavdya Dongar: Son Jumps, Parents Die Trying to Save Him
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावाM Modi’s ‘Naxali Dimag’ Remark Sparks Debate: A Look at Political Fallout &
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभारनवी दिल्ली, २६ जुलै : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरण आणि
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील

